उल्हासनगर येथे अल्पवयीन मुलीवर मुलाने केले ब्लेडने सपासप वार, मुलगी गंभीर जखमी.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई/उल्हासनगर,दि.29 मे:- उल्हासनगर महा नगर पालिकेच्या बाल उद्यानात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर गुरवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास एका व्यसनाधीन मुलाने धारधार ब्लेडने हल्ला केला. यात ती अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मोठ्या प्रमाणात शरीरातून रक्त बाहेर येत होते, रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलीने आपल्या नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर गोल मैदान परिसरातील बाल उद्यानात गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर परिसरातील गर्दुल्या मुलाने ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले. याप्रकाराने खळबळ उडाली असून मुलीने झालेला सर्वप्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान गर्दुल्ल्या मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. रात्री साडे अकरा वाजता मुलीला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुलीला रात्रीच ठाणे येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. तसेच हल्ला करणारा मुलगा अल्पवयीन असून त्याला अटक करून त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे समजते. हल्ला करणारा मुलगा मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी. टी टेळे यांनी दिली.