नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीला संचालित करणारी मुख्य सूत्रधार विभूती यादव (रा. शिवणी, मध्यप्रदेश) हिला मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) केली अटक

नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीला संचालित करणारी मुख्य सूत्रधार विभूती यादव (रा. शिवणी, मध्यप्रदेश) हिला मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) केली अटक

नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीला संचालित करणारी मुख्य सूत्रधार विभूती यादव (रा. शिवणी, मध्यप्रदेश) हिला मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) केली अटक

✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱

नागपूर : – उपराजधानीत नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीला संचालित करणारी मुख्य सूत्रधार विभूती यादव (रा. शिवणी, मध्यप्रदेश) हिला मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) अटक केली. न्यायालयाने तिला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
उपराजधानीत नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती, हे विशेष.

उपराजधानीतील काही रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका आणि अनाथाश्रमाच्या माध्यमातून नवजात बाळांची परराज्यात विक्री करणाऱ्या काही टोळ्या कार्यरत आहेत. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाने छापेमारी करीत टोळ्या उघडकीस आणल्या. तपास अधिकारी रेखा संकपाळ यांनी बोगस डॉक्टर विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) आणि मोनाली खवास यांना अटक केली होती. २८ जानेवारीला गर्भवती तरुणी मोनाली ही डॉ. विलास भोयरच्या रुग्णालयात आली होती. तिला ७ लाखांत बाळ विक्री करण्याची योजना आखली. मोनालीने ३ फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. त्यानंतर टोळीची सूत्रधार विभूती यादव, नरेश राऊत, राहुल निमजे आणि डॉ. भोयर यांनी तेलंगणातील प्राध्यापक दाम्पत्याला ७ लाखांत विकले. लोकसत्ताच्या वृत्तानंतर एएचटीयू पथकाने तीन आरोपींना अटक केली. तर टोळीची मुख्य सदस्य विभूती यादव ही फरार झाली होती. विभूती ही कोलकाता, गोवा, उत्तरप्रदेश बिहार या राज्यात फिरत होती. पोलिसांनी शुक्रवारी मोठ्या शिताफीने विभूतीला सापळा रचून अटक केली. तिने बाळ विक्री केल्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, डॉ. अक्षय शिंदे, रोशन पंडित, मंदा मनगटे, मानवी तस्करी प्रतिबंधक पथकातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, हवालदार सुनील वाकडे, चालक मंगेश बोरकुटे आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी कारवाई केली.नागपुरातील धरमपेठ, शांतीनगर, लकडगंज, सदर, गिट्टीखदान आणि धंतोली परिसरातील काही रुग्णालयाशी नवजात बाळ विक्री करणाऱ्या साटेलोटे आहे. येथील रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका पोलिसांच्या रडारवर आहेत. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळांचा सौदा रुग्णालय केल्या जातो. नवजात बाळ खरेदी करणाऱ्या दाम्पत्याच्या नावावर जन्माची नोंद केल्या जाते. त्यासाठी रुग्णालय १ ते ३ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.तेलंगनातील प्राध्यापक दाम्पत्याने ७ लाख रुपयांमध्ये नवजात बाळ खरेदी केले होते. त्यामुळे अवैधरित्या बाळाच्या खरेदी-विक्रीत गुंतलेल्या प्राध्यापक दाम्पत्यावरही पोलीस कारवाई करणार आहेत. आरोपींशी पैशाचा व्यवहार केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तेलंगणातील दाम्पत्यालाही पोलीस ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती आहे.