नामदार .श्री. मनोहर गजानन जोशी विद्या मंदिर नांदवी हायस्कूलचा ९२% निकाल.
एकही विद्यार्थ्यांला अधिकचे क्लास नसून शिक्षकांच्या परिश्रमांना यश.
✍️नितेश पुरारकर ✍️
गोरेगावं विभाग प्रतिनिधी
📞७०२११५८४६०📞
नांदवी : एस एस सी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. असून माणगांव तालुक्यातील नांदवी विद्या प्रसारकं मंडळ. नामदार श्री मनोहर गजानन जोशी विद्या मंदिर नांदवी हायस्कूलचा दहावी बोर्डाचा निकाल ९२% लागला आहे. नांदवी हायस्कूल मध्ये यंदाच्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षेकरता एकूण २4 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून विशेष म्हणजे यापैकी एकही विद्यार्थी अधिकचे क्लास न लावता नांदवी हायस्कूलचा ९२% निकाल लागला आहे या मागचे सर्व श्रेय विद्या प्रसारक नांदवी संस्थेचे- अध्यक्ष व सचिव तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थीन मागे शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे बहुतांश विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले.यामुळे संपूर्ण शाळेचा निकाल ९२ टक्के लागला आहे. यामध्ये कु.गाढवे प्रगती शंकर हिने ८५.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.आंबेकर मनाली विलास हिने ८१.६०% दुसरा क्रमांक मिळवला .कु.पुरारकर श्रावणी दिनेश ७९.८० तृतीय क्रमांक .कु.येलकर पायल संतोष ७२.४० % चतुर्थ क्रमांक तर कु.सावंत प्रथमेश राजेश याने ६६.८०% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .श्री. विजय रघुनाथ सावंत .सेक्रेटरी-काशिनाथ शंकर सावंत. खजिनदार-विजय बाबा सावंत. विश्वस्त-वसंत भाई सावंत तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शेकबा मारुती पवार व इतर शिक्षक-बी एम म्हेत्रे सर. एस पी सुर्वे सर. एम व्ही नरके सर. के के वावेकर सर . एस आर माने सर. ए बी सुरळकर सर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांस कडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.