श्री साई पॉलिटेक्निकला राष्ट्रीय मान्यता मंडळ  मानांकन दर्जा प्राप्त

श्री साई पॉलिटेक्निकला राष्ट्रीय मान्यता मंडळ  मानांकन दर्जा प्राप्त

श्री साई पॉलिटेक्निकला राष्ट्रीय मान्यता मंडळ  मानांकन दर्जा प्राप्त

श्री साई पॉलिटेक्निकला राष्ट्रीय मान्यता मंडळ  मानांकन दर्जा प्राप्त
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 मे
स्व.एम.डी. येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत मागील तिस वर्षापासून श्री साई पॉलिटेक्निकचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ. व्हि.एम. येरगुडे यांनी चंद्रपूर जिल्हातील होतकरू व दुर्बल आर्थीक गटातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तंत्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू केलेले श्री साई पॉलिटेक्निक संस्थेचे उपाध्यक्ष मा. अभिषेक व्हि. येरगुडे व सचिव मा. अमित व्हि. येरगुडे हयांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट तंत्रशिक्षण देण्याचे कार्य करीत असून ०५ ते ०७ एप्रिल २०२४ रोजी शैक्षणिक क्षेत्रात मानांकनासाठी सर्वोच्च समीती कडून संस्थेची पाहणी करण्यात आली होती त्याचा निकाल नुकताच आला असून श्री साई पॉलिटेक्निक साई पॉलिटेक्निक चंद्रपूर चंद्रपूरला एन.बि. ए मानांकन दर्जा देण्यात आला असून जिल्हातील एन.बि ए. मानांकन दर्जा प्राप्त एकमेव पॉलिटेक्निक ठरले आहे.

यावेळी समिती कडून इलेक्ट्रिकल इंजिनिरींग व कंम्प्युटर इंजिनिरींग या विभागासोबतच अध्यक्षाकडून संस्थेतुन मेरीट आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तसेच संपुर्ण निकाल, प्लेसमेंट, करीअर गाईडन्स, ईडीसी सेल, वर्कशॉप, लायब्ररी, प्रयोगशाळा, मुलांचे व मुलीचे वस्तीगृह, जिमखाना, कॅनटींग व संस्थेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सोई व सवलती, यासोबतच कॉलजचे माजी विद्यार्थी तसेच औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या एचआर व डायरेक्टर, विद्यार्थ्यांचे पालक आणि चालु सत्रामधिल विद्यार्थ्यांशी वैयक्तिकरीत्या त्यांनी संवाद साधत त्यांचाकडून मिळालेला प्रतिसाद उल्लेखनिय होता आणि संस्थेतील माजी विद्यार्थी मोठ मोठया नांमाकित कंपन्यामध्ये तसेच सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असल्याचे च्यांच्या निर्दशनात आले. एकंदरीत तिन दिवसीय तपासणीमध्ये त्यांनी संस्थेच्या प्रगतीच्या आढावा घेतला. या तपासणीमध्ये समिती कडून श्री साई पॉलिटेक्निक समिती खरी उतरली असुन इलेक्ट्रिकल इंजिनिरींग व कंम्प्युटर इंजिनिरींग या दोन कोर्ससाठी कडून एन.बि.ए. मानांकन दर्जा देण्यात आला आहे.

संस्थेला एन . बि.ए मानांकन दर्जा प्राप्त झाला यांचा कॉलेजचे प्राचार्य एस. एन. पिलारे यांनी आंनद करीत एन बि.ए.देखसमितीच्या तपासणी दरम्यान वेळोवेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. व्हि. व्हि. येरगुडे, उपाध्यक्ष मा. अभिषेक व्हि. येरगुडे व सचिव मा. अमित व्हि. येरगुडे यांचे योग्य मार्गदर्शन व व्यक्त संस्थेचे सहकार्य लाभले त्यांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले. त्याचसोबतच एनबीए कोऑडिनेटर ए. एच. खान, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.ए. आर. बहाले, सर्व विभागप्रमुख, वर्कशॉप सुपरीटेन्ड, ग्रंथपाल, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे माजी विद्यार्थी, विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांचे सुध्दा मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे त्यांचे सुध्दा आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.