महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड बौद्धवाडी गावाला स्वदेस फाउंडेशन मार्फत मिळाला स्वप्नातील गावाचा दर्जा

महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड बौद्धवाडी गावाला स्वदेस फाउंडेशन मार्फत मिळाला स्वप्नातील गावाचा दर्जा

महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड बौद्धवाडी गावाला स्वदेस फाउंडेशन मार्फत मिळाला स्वप्नातील गावाचा दर्जा

महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड बौद्धवाडी गावाला स्वदेस फाउंडेशन मार्फत मिळाला स्वप्नातील गावाचा दर्जा

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞८९८३२४८०४८📞

माणगांव :- स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व संचालक प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अनेक विकासाची वेगवेगळी कामे होत आहेत. दोन वर्ष आधी स्वदेस फाउंडेशन ने गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वप्नातील गाव या स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये अनेक गावांनी हिरारीने भाग घेतला होता. त्यावेळी कांबळे तर्फे बिरवाडी बौद्धवाडी या गावाने सुद्धा स्वप्नातील गाव स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर गाव विकास समितीच्या पुढाकाराने स्वदेस फाउंडेशन आणि शासन यांच्या मदतीने गावातील सर्वांगीण विकासावर भर देऊन गाव सक्षम व समृद्ध बनवले. स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून या गावाला सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी स्वप्नातील गावाचा किताब देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रसाद पाटील व महाव्यवस्थापक विशाल वरुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच स्वदेस फाउंडेशनच्या व्यवस्थापक प्राजक्ता खेडेकर मॅडम, व्यवस्थापक मिलिंद आढाव, दिलीप खांबट, वरिष्ठ समन्वयक सरिता गायकवाड संजय गांगुर्डे, सुप्रिया जामखिंडे तसेच अशोक बंधू देशमुख मा.सरपंच, शशीकांत खं. देशमुख मा. सरपंच, राजूशेठ कलमकर मा.सरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत कांबळे तर्फे बिरवाडी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीन जाधव व प्रास्ताविक सुनील जाधव अध्यक्ष गाव विकास समिती, आणि समितीचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील युवक, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांबळे तर्फे बिरवाडी बौद्धवाडी हे गाव महाड शहरापासून साधारणता 8 किलोमीटर अंतरावर आहे. लोकसंख्येने हे गाव जरी लहान असले तरी या गावाने एकत्रितपणे पुढे येऊन गाव विकासासाठी खूप कामे केली आहेत. या गावामध्ये अंतर्गत पक्का रस्ता आहे, सर्व घरे रंगीत आहेत, सर्वांकडे शौचालय आहे, पिण्याचे शुद्ध पाणी आहे, सर्व कुटुंबांचा आरोग्य विमा आहे, सर्व कुटुंबांच्या हाताला काम आहे, पात्र लाभार्थ्यांना पेन्शन योजना मिळत आहेत, गावामध्ये प्लास्टिकचे 100% व्यवस्थापन केले जात आहे, ओल्या व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे, अशी अनेक विकासाची काम या गावांमध्ये झालेले आहेत त्यामुळेच या गावाला स्वप्नातील गावाचा दर्जा मिळालेला आहे.

गावाचा विकास करण्यासाठी आणि गाव स्वप्नपूर्ण बनवण्यासाठी गाव विकास समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांची विशेष मेहनत आहे, त्याचबरोबर गावातील युवा समिती आणि महिला यांचे योगदान सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.

कांबळे तर्फे बिरवाडी बौद्धवाडी या गावाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून महाड तालुक्यामध्ये एक नवीन आदर्श उभा केलेला आहे .