दिशा फाउंडेशन सेंटर वाई आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ.

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :दिशा फाउंडेशन सेंटर वाई येथे विद्यार्थांना उन्हाळी सुट्टीचे योग्य नियोजन करून इयत्ता ७ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचा परिचय करून कृतिशील अध्यापनाच्या माध्यमातून ४५ दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा निरोप समारंभ मंगळवार दिनांक २८ मे २०२४रोजी करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या ४५ दिवसीय प्रशिक्षणात जे काही महत्त्वपूर्ण कौशल्य आत्मसात केले ते व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमन एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक प्रा. डॉ. नितीन कदम सर आणि संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. रुपाली कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रा. सुशील कुमार यांनी प्रास्ताविक व परिचय ppt द्वारे पालकांना करवून दिला प्रा. डॉ .नितीन कदम यांनी मुलांना प्रोत्साहन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुलांच्या पुढील वाटचालीत पालकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असणार आहे असे पालकांना सांगितले.
प्रा. रुपाली कदम यांनी फाउंडेशन संदर्भात माहिती दिली. याबद्दल असणारे फायदे पुढील वर्षात कसे उपयोगी पडतील असे पालकांना सांगितले.
रचना पोतदार यांनी ४५ दिवसांत मुलांसोबत आलेले अनुभव पालकांसोबत शेअर केले.मुलांनी देखील मत व्यक्त केले.