भिवंडी पोलिसांची धडक कारवाई, गांजा, देशी कट्टासह चोरीच्या 13 दुचाकी जप्त; नऊ आरोपींना अटक.

✒अभिजीत सपकाळ, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई/भिवंडी,दि.29 जुन:- मुंबईच्या भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढ झाल्याची माघील अनेक घटनेवरुन समोर येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी, चैन स्नेचिंग, चोरीच्या घटनेत वाढ झाली असताना वाढत्या गुन्हेगारी कारवायांना रोकण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने नऊ आरोपींच्या मुसक्या आवळीत विविध 16 गुन्ह्यांची उकल करीत 12 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यामध्ये मोटरसायकल चोरी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, अमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस पथकास मीळालेल्या गुप्त माहिती वरुन रेकॉर्ड वरील मलंग यासर जाफरी, मोहम्मद आसिफ मोहम्मद इम्तियाज अन्सारी दोघे रा.पिराणी पाडा, शांतीनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळून भिवंडीसह नवी मुंबई, मुंब्रा या भागातून चोरी केलेल्या 8 मोटरसायकलसह पाच बेवारस मोटरसायकल, दोन मोबाईल एक सोन्याची चैन असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
तर पोलीस गस्ती दरम्यान रात्री अडीच वाजताच्या सुमारास एका कार मध्ये मोहम्मद नुमान नूरअली अन्सारी, जहांगीर दाऊद शेख, नफिस उर्फ राजू शहाबुद्दीन अन्सारी फिरत असताना या तिघा जणांना संशयावरून ताब्यात घेत त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळून एक देशी कट्टा, एक जिवंत काडतुस, मिरची पूड , कुकरी असे शस्त्र आढळून आले. चौकशीत टेमघर येथील आशापुरा ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा त्यांचा इरादा असल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्यापूर्वीच आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
दुसऱ्या एका घटनेत गायत्री नगर दत्त मंदिरा जवळील घरातून 81 हजार 560 रुपये किमतीचा चार किलो 78 ग्रॅम गांजा आढळून आला असून याप्रकरणी आरोपी हुसेन मोहम्मद अन्सारी यास ताब्यात घेतले तर संजय नगर या भागात नशे करीता वापरण्यात येणाऱ्या 10 हजार रुपये किमतीच्या गोळ्या आढळून आल्या असून या गुन्ह्यात इम्रान मोहम्मद मोअज्जम इस्लाम शेख, अराफत मोहम्मद इस्लाम शेख व मोहम्मद अक्रम मोहम्मद वहिद अन्सारी उर्फ बाबा डिंग डाँग अशा तिघांना ताब्यात घेत या तिघांनाही अटक केली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. शांतीनगर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.