लातूर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम बापाने केली पोटच्या मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या.

✒लातूर जिल्हा प्रतिनिधी✒
लातूर,दि.29 जुन :- लातूर जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीची नराधम बापाने हत्या केल्याचा बातमीने संतापाची लाट पसरली आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बापान आपल्या पोटच्या मुलीला मारहाण केली. त्यानंतर या नराधम बापाने या चिमुकलीला पाण्याच्या टाकित फेकून दिले त्यात तिच्या तडफडून जीव गेला. लातूर जिल्ह्यातील आशीवमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्यात बुडून चिमुकलीचा करुण अंत झाला. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.
नराधम आरोपी संतोष भोंडे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरात पत्नी-मुलांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी आणि आई-वडील शेतावर गेल्यानंतर घरात मुले खेळत असताना आरोपीने दीड वर्षांच्या चिमुकलीला मारहाण केली आणि पाण्याच्या टाकित फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरी परतल्यावर मुलांनी आई आणि आजी-आजोबांना ही घटना सांगितली. त्यानंतर भादा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.