कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोल्हापुर ग्रामीणची जिल्हा आढावा बैठक संपन्न.

28

कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोल्हापुर ग्रामीणची जिल्हा आढावा बैठक संपन्न.

फ्रंटल व सेलच्या जिल्हाध्यक्ष यांना जिल्हा व तालुका कार्यकारिणी सादर करण्यास शेवटची मुदत: जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील

कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोल्हापुर ग्रामीणची जिल्हा आढावा बैठक संपन्न.
कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोल्हापुर ग्रामीणची जिल्हा आढावा बैठक संपन्न.

लियाकत मदारी, कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी✒

कोल्हापुर:- जिल्हा ग्रामीण कार्यालय राष्ट्रवादी भवन, श्री शाहु मार्केटयार्ड कोल्हापुर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाम जयंत पाटील यांच्या संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने पाठविलेल्या परिपञाकानुसार जिल्हाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा फ्रंटल व सेल आणि त्यांचे निरिक्षक यांची कार्यप्रणाली बाबतची आढावा बैठक जिल्ह्याचे नेते प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी नाम हसनसो मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, प्रदेश प्रतिनिधी मदन कारंडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.

यावेळी स्वागत व प्रास्तविकात जिल्ह्याचा आढावा घेताना जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले की, प्रदेश राष्ट्रवादी ने संघटनाबांधणीच्या दृष्टिने कार्यप्रणालीस अनुसरून काम करायचे असेल तर जिल्हा कार्यकारिणीसह तालुका, विधानसभा, शहराध्यक्ष व जिल्हा सेल फ्रंटल ची कार्यकारिणी पूर्ण असणे व त्यानुसार पदाधिकारी यांची निवडी करणे आवश्यक आहे हे जाणुन जिल्हा राष्ट्रवादी ने यासंदर्भात आजतागायत 9 आढावा बैठका घेतल्या यामध्ये फादरबाॅडीच्या सर्व जिल्ह्यासह सर्व कार्यकारिणीची मान्यता घेऊन पदाधिकारी निवडी जाहिर झालेल्या आहेत तथापी जिल्हा सेल व फ्रंटल च्या गेल्या चार ते पाच वर्षापुर्वी निवड होऊन ही त्यांच्या कडुन या संदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसल्याचे स्पष्टपणे मत मांडले व पक्ष संघटनेच्या हिताचे नाही त्यामुळे तालुका निहाय जिल्हा सेल व फ्रंटलचा आढावा समाधानकारक नाही तरी जिल्हा सेल व फ्रंटलच्या पदाधिकारी यांनी आपआपली जिल्हा व तालुका कार्यकारिणी त्वरित पुर्ण करून सादर करावी अन्यथा याचा अहवाल जिल्हा प्रभारी हसन मुश्रीफ आणि प्रदेश कार्यालयास सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, आजही शरद पवार साहेब तरूणाला लाजवेल असे अखंडपणे सर्व सामान्यांच्या हितासाठी काम करत आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र पिंजुन काढताना तालुका निहाय आढावा बैठकांचा सपाट्टा लावत पहिला टप्पा पुर्ण करून आता दुसरा टप्पा सुरू केलेला आहे त्यामुळे तिसरा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र असेल आणि तो लवकरच होणार असल्यामुळे आपण तयार असले पाहीजे त्यामुळे सेल व फ्रंटलच्या सर्व जिल्हाध्यक्ष यांनी आपली कार्यकारिणी करणे गरजेचे आहे. जर आपली निवड होऊन चार पाच वर्षे झाली तरी आपण जिल्हा व तालुका कार्यकारिणी करणारच नसाल तर पक्ष संघटना कशी बळकट होईल आणि आपण कामच करणार नसाल आणि पद घेऊन फक्त मिरवणार असाल तर ते काय कामाचे नाही जर कामच करायचे नसेल तर जागा आडवु नका जर आठ दिवसात संपूर्ण कार्यकारिण्या जिल्हा कार्यालयाकडे सादर न झाल्यास आपणास पक्षाचे काम करावयचे नाही असे समजुन नवीन पदाधिकारी यांच्या निवडी केल्या जातील याची नोंद घ्यावी ही आपल्याला शेवटची मुदत देत आहे. निवडी करताना तालुक्यातील नेतेगण, तालुकाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या सिफारशी घेऊनच केल्या जाव्यात जेणेकरून कोणत्याही तक्रारी होणार नाहीत आणि जिल्हा कार्यालयाच्या मान्यता घेऊन त्या निवडी जाहीर केल्या जाव्यात. अशा महत्वपुर्ण गोष्टी याप्रासंगिक व्यक्त करण्यात आल्या. यावेळी आभार अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर यांनी मानले मनोगत बाळासाहेब देशमुख, मदन कारंडे, अमरसिंह माने-पाटील, संतोष मेंगाणे, रोहित पाटील, रामराव इंगळे यांनी व्यक्त केले.

सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख आणि अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर यांनी विस्तारित जिल्हा कार्यकारिणीसह, तालुका (12+1), विधानसभ (9), शहराध्यक्ष (14) सर्व कार्यकारिणी सादर करून निवडीचे पञ प्रदान कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी अभिनंदन केले.

यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अल्पसंख्यक सेल यासिन मुजावर, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अनिरूद्ध गाडवी, विधार्थी सेल जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, इचलकरंजी विधानसभाध्यक्ष नितीन जांभळे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष शिरिष देसाई, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष रामराव इंगळे, पदवीधर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगाणे, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई,मा प्रकाश पाटील, मा शिवानंद माळी, डि.बी. पिष्ठे यांच्यासह मान्यवर नेतेगण व पदाधिकारी यांच्यासह तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व पदाधिकारी, नगरपालिका क्षेञ शहराध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा सेल व फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.