महाविद्यालयीन फी मध्ये पन्नास टक्के सवलत द्या: खा. धैर्यशील माने यांचे विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन.

53

लियाकत मदारी कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी

कोल्हापुर,दि.28 जुन:- कोविड 19 च्या महामारी मध्ये देशात आणि राज्यात टाळेबंदी ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. सध्याची परिस्थिती पाहता बहुतांश पालक वर्ग बेरोजगारीला सामोरे जात असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कॉलेज फी मध्ये 50 टक्के सूट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळाली अशा प्रकारचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी. टी. शिर्के यांना खासदार धैर्यशील माने यांनी दिल आहे.

महाविद्यालयीन फी भरली नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना काही शिक्षण संस्था ऑनलाइन शिक्षणातून बाजूला करत आहेत तर काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देत नाहीत यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान होईल त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत याकडे कुलगुरूंनी लक्ष घालावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी केली आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, युवा सेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार विलास नांदवळकर, मयुर भोसले, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.