मेव्हणी अनिशाला वश करण्यासाठी आलोकचे भयावह प्रकार; नागपूर हत्याकांड

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
नागपूर, 28 जून :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करून नंतर आलोक माटूळकर आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. आता या हत्याकांडामागचे धागेदोरे उकलायला सुरुवात झाली आहे. आलोक वासनेत इतका आंधळा झाला होता की त्याला बायको विजयापेक्षा अनिशामध्ये अधिक रुची होती.
त्यामुळे अलोक स्वतःच्या बायकोपेक्षा अनिशावर अधिक अधिकार गाजवायचा. त्यामुळे तिने कोणासोबत बोलणे, कोणाच्या साधे संपर्कात राहणे देखील अलोकला मान्य नव्हते. अनिशा आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी तिच्यावर वशीकरण मंत्राचा वापर करीत होता. कामुकतेबद्दल यूट्यूबवरून माहिती काढायचा व अनिशाला नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. मात्र अनिशाला हे मान्य नव्हतं. तिला स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचे होते. त्यात तिला आलोकला हस्तक्षेप मुळीच मान्य नव्हता. यावरून दोघात खटके उडायचे.
अलोक अनिशाच्या इतक्या जवळ गेला होता की त्या प्रेमापोटी तो आपली बायको विजयाचा राग करायचा. त्याचे हेच अति प्रेम पाच सदस्यांच्या जीवावर बेतले. अनिशाला संपवण्याचं त्याने आधीच ठरवलं होते. ती मेल्या नंतर आपले सर्वच संपले असे आलोकला वाटले असावे, त्यातून मग हे हत्याकांड घडले असावे अशी एक थेअरी पुढे येत आहे. सासरे घटनेच्या दिवशी घरी असते तर त्यांची पण हत्या झाली असती असे पोलिसांना वाटते.
आरोपी अलोक माटूळकर हा मानसिक विकृत होता की परिवारातील सदस्यांबद्दल त्याच्या मनात आधीपासून राग होता का, या दोन अँगलवर तपास सुरूच आहे. यासाठी आलोकची मुलगी परी व मुलगा साहिल यांची डीएनए टेस्ट करण्यात येणार असून ही मुले आलोकची होती की नाही यातून घटनेने मागचे कारण शोधण्यात पोलिसांना मदत होणार आहे. सोमवरला आलोकने सुरुवातीला सासू लक्ष्मी बोबडे व मेव्हणी अनिशा बोबडे यांची हत्या केली. त्यांनतर 100 मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या राहत्या घरी आला. तेथे त्याने आपली पत्नी विजया, 14 वर्षाची मुलगी परी यांचे हातपाय बांधले व गळा आवरुन हत्या केली. तर 12 वर्षाचा मुलगा साहिल यांची उशीने नाक दाबून हत्या केली व त्यानंतर स्वत: देखील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.
अलोक माटूळकर हा स्वभावाने बाहेर शांत व घरात रागीट असल्याने हत्येच्या करणामागच्या निष्कर्षावर पोहचण्यासाठी फॉरेन्सिक अहवाची मदत घेतली जात आहे. हत्येच्या दिवशी अनिशाने आपला मोबाईल रेकॉर्ड मोडवर ठेवला होता. त्यामुळे मेव्हणी अनिशा व सासू लक्ष्मी यांच्या हत्या कशाप्रकारे झाल्या, याची ऑडिओ क्लिप पोलिसांकडे आहे. त्या क्लिपवरून पोलीस हत्याकांडामागच्या कारणाचे रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करत आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे.