शेतकऱ्यांच्या समोर परत मोठं संकट
उगवलेले अंकुरही करपण्याच्या मार्गावर
शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.नं.9518727596
गोंडपिपरी तालुक्यातील परीसरात भागात जवळपास चांगल्या प्रकारे अवकाळी पावसाणे हजेरी लावली त्या मुळे पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकर्यांनी खरिप पेरणीला सुरुवात केली काही शेतकर्यांनी तर आपले संपुर्ण शेत सोयाबीन ,कपास , तुरि , धान,खत सुध्दा पेरले व ईतर पीके याची टिबणी व पेरणी करुन मोकळेही झाले त्या पेरलेल्या बियाण्याला अंकुरही फुटले मात्र आता पावसाने दडी मारल्याणे हे पीक आता करपण्याच्या मार्गावर आले आहे सध्या मोठया प्रमाणात पाऊस झालेला नाही, परंतु मोठा पाऊस पडेल व आपणास पेरणीला उसंत मिळनार नाही या भीतीने शेतकर्यांनी पेरणीसाठी गडबड केली तसेच पाऊसही बर्यापैकी असल्यामुळे आता पुढे चांगला पाऊस पडेल या आशेने पेरणी केली पन मागील आठ दिवसांपासुन अडेगांव, नंदवर्धन,सुपगांव,धामणगाव, दरूर,पारगांव, चेक दरूर, शिवणी देशपांडे, सालेझरी,पानोरा, परिसरात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे शेतातील अंकुरलेली पीके करपण्याचा मार्गावर आले आहे याचा फटका शेतकर्यांना चांगलाच बसुन शेतकर्यांना दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागनार आहे आधिच,सोसायटी,बैंक यांच्याकडुन पीक कर्ज घेवून शेतात पेरणीकरिता पैशाची जळवाजळत केली,पेरणी केली मात्र आता पावसाअभावी पीक करपून शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान होनार आहे.कर्जाचा बोजही दुपटिने वाढण्याची शक्यता आहे