पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548📞
वाशिम /जिल्ह्या
वाशीम जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे तपशील याप्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के (२०.३० लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार
कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार वाशीम जिल्हा षणमुगराजन एस यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला व उपाययोजना करण्या साठी निर्गमित आदेश देण्यात आले आहे.✍