औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव कॅबिनेट मध्ये मंजुरी..

औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव कॅबिनेट मध्ये मंजुरी..

औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव कॅबिनेट मध्ये मंजुरी..

सोयगाव तालुका प्रतिनिधी
तन्मय सुनिल जैन
7588165274

सोयगाव : – संभाजीनगर.आज दिनांक 29-6-2022 रोजी मा.मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे यांनी औरंगाबाद चे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद चे नाव धाराशिव असे कॅबिनेट मधील बैठकीत पास केले. याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हर्ष उल्ल्हासाची लाट उसळली आहे. स्व श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ही मागणी शिवसेनेने लाऊन धरली होती. पण मागील अडीच वर्षांपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री असून सुद्धा अजुन नामांतर झाले नाही म्हणून नेहमीच भाजपा तर्फे टीकास्त्र उगारले गेले होते.पण आता संभाजीनगर नामकरण झाल्यावर सर्व पक्षातर्फे मुख्यमंत्रीचे अभिनंदन केले जात आहे
उद्या सकाळी मंत्रलायात बहुमत चाचणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा. जेणेकरून संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार आपल्या बाजूने मतदान करतील असे मुख्यमंत्री महोदय यांना वाटले असावे. आणि जर तसे नाही झाले तरी येणाऱ्या काळातील महानगरपालिका निवडणूक मध्ये याचा नक्कीच फायदा हा शिवसेनेला होईल हे मात्र नक्की.
नक्की शिवसेना आपले गड राखणार का की भाजप याच्यात सुद्धा वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे