अपघातात युवक ठार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
वरोडा : दिनांक 29 जून
दुचाकीने आपल्या गावी भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वार युवकाची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला लागली, यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मंगळवार रात्री 10 वाजता नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील मजरा गावाजवळ घडली.
सविस्तर वृत्त असे की, वरोडा येथून दुचाकी दुरुस्तीचे काम आटोपून आशिष चंपत हक्के, ( 24 ) हा युवक बांद्रा येथील आपल्या गावाला मंगळवारच्या रात्री निघाला होता. मजरा या गावाजवळ रस्त्याच्या कडेला एम एच 34 बी.जी. 9063 हा नादुरुस्त ट्रक उभा असताना भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या आशिषने उभ्या ट्रकला मागावून धडक देताच तो रस्त्याच्या बाजूला फेकला गेला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास वरोडा पोलिस करत आहेत.