गोंडपिपरी नगरपंचायत बनली जनतेची डोकेदुखी, गोंडपीपरीतील नागरिक त्रस्त

गोंडपिपरी नगरपंचायत बनली जनतेची डोकेदुखी,

गोंडपीपरीतील नागरिक त्रस्त

गोंडपिपरी नगरपंचायत बनली जनतेची डोकेदुखी, गोंडपीपरीतील नागरिक त्रस्त

शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.नं.9518727596

गोंडपिपरी:- नगरपंचायत अस्तित्वात येऊन पंचवार्षिक पूर्ण झाली. आधीच्यl पंचवार्षिक काळात. बऱ्यापैकी कामे झाली त्यात भाजपाचे सरकार होते सुधीर मुनगंटीवार यांनी पायाभूत गरजा लक्षात घेता दहा कोटी रुपये उपलब्ध करून रोड रस्त्यांची जाळे विणली एवढ्यावरच न थांबता अकरा कोटी रुपये उपलब्ध करून पाण्याची समस्या निकाली काढत गोंडपिपरी शहरवासीयांसाठी नळ योजना अमलात आणली. आणि आता पंचवार्षिक संपताच नगरपंचायत ला ग्रहण लागल्यासारखे झाले असूनझाले असून चार महिने पूर्ण झाले असून अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे आहे परंतु वरिष्ठांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे गोंडपिपरी शहराची पुरती वाट लागली आहे
मागील काळात रूजू झाल्यापासून येथील पदभार हा प्रभारी मुख्याधिकारी विषाखा शेळके यांच्याकडे आहे .महत्वाचे म्हणजे मागील काळात एक ते दोन वर्ष सुद्धा येथील प्रभार यांनीच सांभाळला होता त्यादरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला होता तसेच स्व मर्जीतील कंत्राटदाराला आणणेआणि नियमाला डावलून अनेक कंत्राट नियमबाह्य पद्धतीने केली होती. यात कमी-जास्त शंभर लक्ष रुपयांचे नुकसान नगरपंचायतीला झेलावे लागले होते. व नंतर त्यांचा प्रभाव तिथून काढून टाकण्यात आला होता आणि आता त्यांनाच येथील प्रभार देण्यात आलेला आहे परंतु हे येथे रुजू झाल्यापासून आजपर्यंत फक्त एक दिवस नगरपंचायतीला भेट दिलेली आहे. मासिक सभेत ठराव होऊनही ही कुठलेही कामे मार्गी लागत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . आज घडीला गावातील कचरा संकलित करण्यासाठी ऑटो ,(घंटागाडी,) डिझेल साठी पैसे नाही त्यात मुख्याधिकारी ही. नाही काम बंद पडल्या ने कचऱ्याचे ढिगारे गावात पडले आहे तसेच घरोघरी कचरा संकलन बंद पडले आहे आणि गावातील नळ योजना ही ठप्प पडल्याने नळाला पाणी सुद्धा बंद आहे महत्त्वाचे म्हणजे गावातील अनेक बोरिंग बिघडल्याने ते सुद्धा बंद असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे या सर्व समस्या समोर उभ्या असतानाही मुख्याधिकारी शेळकी याकडे दुर्लक्ष करून इथे
येत नाही. परंतु विशेष करून बिलांची आर्थिक देवाण-घेवाण करताना त्या गडचांदूर येथे तत्परतेने सोपस्कार पार पाडत असतात .
अनेक विकास कामे प्रलंबित पडले असून नगरपंचायत ही फक्त शोभेची वास्तू म्हणून उभी आहे जनतेची कोणतीही कामे असो आज घडीला होत नसल्याने जनते सह नगरसेवकांमध्ये ही रोष व्यक्त केला जात आहे आता तात्पुरता प्रभार चंद्रपूर येथील जिल्हा प्रशासन अधिकारी अजित डोके यांचे कडे देण्यात आला होता मात्र तो सुध्दा 7दिवसात च काढून टाकण्यात आला व विशका शेळकी यांचे कडेच देण्यात आल्याने नगरपंचायतीला संकटाचा सामना करावा लागत आहे
=======================
डब्यामध्ये घ्या
गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये कुठलीही जनतेची कामे हे होत नाही
मुख्यधिकाऱ्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे
मुख्याधिकारी हे गडचांदूर वरून कामे हाताळत असल्याने सपशेल अपयशी ठरत आहे
*सुनील संकुलवार*
*नगर सेवक*
*गोंडपिपरी.*