नागभिड तालुका शिवसेनेचा कडुन उद्धव ठाकरेंचा साहेब यांना पांठीबा
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
मो न–9403321731
नागभिड —राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत, शिवसेनेच्या ३० हुन अधीक आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीत दाखल झाले. तिथे त्यांनी बंड केला अशावेळी महाराष्ट्रात सत्तातरांचे राजकारण सुरू असुन,शिवसैनिकामध्ये शिंदे विरोधात मोठा असंतोष पहायला मिळत आहे. त्याच मातृभुमीवर नागभिड तालुका शिवसेनेतफेॅ पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.यावेळी एकनाथ शिंदेची ज्या पद्धतीने दाढी व मिशी वाढली,तसी बुद्धीदेखील वाढावी अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना तालुका प्रमुख श्री, भोजराज ज्ञानबोनवार यांनी दिली. आमदारांना हलविण्यासाठी चार्टर विमान वापरण्यात आला असता,गडचिरोली जिल्ह्यामधे पुरात अडकलेल्यांना कधी टार्चर विमानाने मदत पोहचवितांना पालकमंत्र्यांना पाहीले नाही. तेथील शेतकरी व बेरोजगांराना कधी मदत केली नाही, असा टोमण्याही तालुका प्रमुख यांनी लावला यावेळी बैठकीला तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार, उप तालुका प्रमुख मनोज लडके, प्रशीध्य प्रमुख अरुण भोले, नंदु खापर्डे उपशहर प्रमुख, रुपेश कडू
पुष्पदेव ब्राम्हणकर,धनराज गणविर,नाझिम शेख, संतोष बुरबांधे, अरुण खापरे,बालु चिलमवार, नानाजी अमृतकर,मयुर वंजारी,प्रशिल निमगडे यांच्या सह अनेक शिवसैनीकांची उपस्थिती होती.