प्रा. रविकांत वरारकर यांचे सेट परीक्षेत यश
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्युरो चीफ
📱 8830857351
चंद्रपूर : 29 जून : -भद्रावती येथील रहिवासी प्रा. रविकांत वरारकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेट परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. रविकांत वरारकर यांनी इंग्रजी विषय घेऊन परीक्षा दिली. २७ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार रविकांत वरारकर हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या रविकांत वरारकर हे गोंडवाना विधापीठातून इंग्रजी विषयात आचार्य पदवीचे शिक्षण पूर्ण करीत असून, जनता महाविद्यालयात कनिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जीवतोडे, सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य एम. सुभाष, उपप्राचार्य कविता रंगारी तथा सहयोगी प्राध्यापकांना दिले आहे.