वृद्धाश्रमात जवंजाळ परिवाराने ब्ल्याकेट तर इंगळे परिवराने धान्य केले वाटप
✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 8208166961
चिखली :- स्व. जगन्नाथ बापू जावंजाळ व स्व. विठ्ठल इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील वृद्धाना थंडी पासून बचाव होण्यासाठी गरम कपडे व ब्ल्याकेट तसेच भोकर येथील स्व. विठ्ठल इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरेश इंगळे व गजानन इंगळे यांनी धान्य केले वाटप.
चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटल चे डॉ संदीप जावंजाळ यांचे वडील स्व. जगन्नाथ बापू जवंजाळ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाना थंडी पासून बचाव करण्यासाठी गरम कपडे व ब्ल्याकेट वाटप करण्यात आले. यावेळी वृद्धाच्या चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य पाहून डॉ जवंजाळ भावनिक होत इतरांनी ही या वृद्धाश्रमातील वृद्धाच्या मदती साठी समोर आले पाहिजे असे आव्हान केले तसेच ते डॉ पेशेंत असल्यामुळे गोर गरीब जनतेला नेहमी सहकार्य करीत असतात त्यांनी वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असतात
तसेच भोकर येथील स्व.विठ्ठल इंगळे यांचे सुद्धा वृद्धपकाळाने दुखत निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एस टी डेपो चे वाहक नियंत्रक सुरेश इंगळे व गजानन इंगळे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत वृद्धाश्रमात एक क्विंटल गहू तांदूळ तेल डाळ साहित्य वृद्धाश्रम मध्ये वाटप केले. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धासह जेष्ठ समाज सेवक
राजूभाऊ जवंजाळ, सौं छायाताई वानखेडे, डॉ अश्विनी जवंजाळ, निलेश खरात, विश्वनाथ इंगळे, सुरेश इंगळे गजानन इंगळे, सौ.रेखाताई इंगळे, अश्विन इंगळे ,आदित्य इंगळे, भगवान कऱ्हाडे, सागर डोंगरदिवे, संस्थेच्या अध्यक्ष सौं लता बाई डोंगरदिवे, संचालक प्रशांत डोंगरदिवे, रुपाली डोंगरदिवे, द्वारका बाई घेवंदे, प्रियांका वानखेडे व इतर उपस्थित होते