डॉ.पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

डॉ.पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

डॉ.पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8973248048📞

माणगाव : डॉ.पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे अवचित्त साधुन कृषि संजीवनी पंधरवडा दिनांक २८/०६/२०२४ रोजी तळा तालुक्यातील शेणाटे येथील गावदेवी मंदिर येथे घेण्यात आला. यावेळी कृषि संजीवनी करावयाची कामे एम .आर .जी. एस. फलबाग लागवड, सेंद्रिय शेती, शेततळे ,याबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना,१ रुपये मध्ये भात पीक विमा बद्दल चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी चे विमा प्रतिनिधी जितेंद्र पिंपळे सर यांनी पिक विमा याविषयी मार्गदर्शन केले व कृषि सहायक दिनेश चांदोरकर सर यांनी कृषि विभागाच्या योजना विषयी माहिती देऊन कृषि पर्यवेक्षक सारिका सावंत मॅडम यांनी भात लागवड तंत्रज्ञान यासाठी चार सूत्री याविषयी विस्कृतपणे मार्गदर्शन केले व गावचे अध्यक्ष राजेश गोटेकर यांच्या हस्ते बांधावर तुरीचे बियाणे लागवड करता वाटप करण्यात आले व कृषि संजीवनी कार्यक्रम संपन्न करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here