मुंबई – गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीचा नागरिकांना जबर फटका…!

मुंबई - गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीचा नागरिकांना जबर फटका...!

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगाव :-मुंबई – गोवा महामार्गावरील माणगांव रेल्वे स्टेशन वरून काही अंतरावर इंदापूरकडे जाताना दशमेश होंडा बाईक शोरूमच्या समोर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे  दिनांक 28 जून रोजी साय. 4.00 वा. च्या सुमारास वडाचे भालेमोठे झाड महामार्गावरच आडवे पडले असता रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ बंद झाल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.हवामान  खात्याच्या इशाराप्रमाणे सकाळपासून मुसळधार पावसाने माणगांव परिसरात चांगलीच हजेरी लावली होती . आठवडा शेवट असल्याने  महामार्गावर गाड्यांची वर्दळ सुरु आहे. त्यात झाड कोसळल्याने महामार्ग बंद झाला.

हा महामार्ग जवळ जवळ तीन तास बंद असल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. याचा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. सदर घटनेची माहिती मिळताच ताबडतोब माणगाव नगरीचे नगराध्यक्ष श्री. ज्ञानदेवजी पवार, माणगांव पोलीस विभागाचे  पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश भिलारे व श्री. प्रवीण धडे, पो.ह.रामनाथ डोईफोडे, वाहतूक शाखेचे पोलीस श्री. शिवराज बांडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेतला. ही वाहतूक कोंडी अतिशय भरदस्त असताना इमर्जन्सी पेशंट असणारी ॲम्बुलन्स आली तिला योग्य तो मार्ग मिळावा यासाठी पोलीस कर्मचारी,नागरिक यांनी साळूंखे रिस्क्रू टीम च्या मदतीने जास्त प्रमाणात वेळ न घालवता कोसळलेले झाड दोन जेसीबिंच्या सहाय्याने बाजूला करत रस्ता मोकळा केला. वाहतूक कोंडी कमी झाल्याने त्रासलेल्या नागरिकांनी सर्व पोलीस विभागाचे आणि सर्व मदतनीस असणाऱ्यांचे आभार मानले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवतहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here