माहूर शहरात वाहन तळासाठी दहा एकर जागा द्या!

माहूर शहरात वाहन तळासाठी दहा एकर जागा द्या!

नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

आदित्य खंदारे
माहूर तालुका प्रतिनिधी
7350030243

माहूर :- श्रीक्षेत्र माहूर शहरात देवदर्शन साठी येणाऱ्या सर्व धर्मीय भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. गडावरील सर्व धर्मीय देवस्थानावर येणारे अधिकांश भावीक खाजगी वाहनाद्वारे येत असल्याने वाहनतळ नसल्याने माहूर शहरात असलेल्या गायरान जागे पैकी दहा एकर जागा विनामूल्य पार्किंग साठी नगरपंचायत कडे हस्तांतरित करावी अशी मागणी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंबई येथे भेटून निवेदन देत केली आहे.

श्रीक्षेत्र माहूर शहर हे देशातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र असुन देविच्या साडेतिन शक्तीपिठापैकी एक पुर्ण शक्तीपिठ आहे.व भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान, निद्रास्थान, प्रसिध्द सोनापीर दर्गा, पांडवलेणी, कैलास टेकडी, वनदेव, देवदेवश्वरी मंदिर अनुसयामाता मंदिर, परशुराम मंदिर अशा अनेक देवदेवतांनी निसर्ग रम्य पर्वतरांगा मध्ये वसलेल हे शहर आहे. यामुळे शहरात दररोज हजारो भावीक दर्शनासाठी येतात. तसेच नवरात्र महोत्सव, श्री. दत्तजयंती यात्रा, राखी पौणीमा परिक्रमा यात्रा व सोनापीर दर्गा उर्स इत्यादी अनेक यात्रा महोत्सव वर्षाभरात होतात. लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाहनासाठी वाहनतळ पार्किंग करिता शहरात जागा राहत नाही. त्यामुळे श्रीक्षेत्र माहूर शहरात वाहन तळाच्या व्यवस्थेकरिता 10 ऐकर गायरान जमिन नगर पंचायत माहूरला विनामूल्य हस्तांतरित करावी अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या कडून करण्यात आली आहे

प्रत्येक यात्रेच्या वेळेस यात्रा बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आधी पार्किंग वाहनतळ च्या जागेचां शोध घ्यावा लागते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी जागामालकांना विनंती करून पार्किंगची व्यवस्था करावी लागते. वाहनांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माहूर शहरात एक अद्यावत वाहन तळ असणे गरजेचे आहे.त्यामुळे माहूर शहरात असलेल्या गायरान जागेपैकी दहा एकर जागा एकाच ठिकाणी विनामूल्य नगरपंचायत ला हस्तांतरित करावी अशी

मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडे केल्याने लवकरच यावर तोडगा निघेल अशी आशा माहूरकरातून व्यक्त होत आहे…..!