बीडमध्ये तरुणीवर अत्याचार “मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”

बीडमध्ये तरुणीवर अत्याचार “मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”

बीडमध्ये तरुणीवर अत्याचार "मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल"
बीडमध्ये तरुणीवर अत्याचार “मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

बीड,दि.29 जुलै:- बीड मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीवर अत्याचार झाला, ती तरुणी स्वत:वर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यासाठी बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, त्यावेळी बीड पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या तरुणीला हीन वागणूक दिली. या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी, म्हणून या तरुणीने आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमरण उपोषण केलं आहे.

अत्याचार पिडीत तरुणी ही एक नर्स आहे. जर मला न्याय नाही मिळाला तर मी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर आत्मदहन करेल, असा संतप्त ईशारा या तरुणीने दिला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करुन मला न्याय द्या, अशी मागणी या पिडीतेने केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून गावातील एका वाळू माफिया आरोपीने तिच्यावर वारंवार शारिरीक अत्याचार केला. काही दिवसांनंतर आरोपी असलेल्या तरुणाच्या मामाने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर देखील हा आरोपी पिडीत तरुणीला त्रास देत होता.

या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावेळी पोलिसांनी तिला अर्वोच्च भाषा वापरली. सहा वर्ष तुला गोड लागलं. मग आता तक्रार देण्यास का आली, अशी भाषा पोलिसांनी पिडीत तरुणाीला वापरली.