हिंगणघाट वर्षावास निमीत्त धम्मप्रवचन मालिका धम्म प्रबोधनाचे आयोजन.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
88886308
हिंगणघाट,दि.29 जुलै:- भारतीय बौद्ध महासभा, तर्फे शनिवार दिनांक 24 जुलै आषाढी पोर्णिमे पासुन वर्षावासाला सुरुवात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी निर्माण केलेल्या मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा, शाखेच्या वतीने वर्षावास श्रृंखलेचे निमित्य साधुन (धम्म प्रबोधन मालिका) या अनुषंगाने रविवार दिनांक 1 आगस्ट ला दुपारी 2 वाजता धम्म प्रबोधन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफण्यात येत आहे.
आज मोठ्या धार्मिक आणि जातीय असंतोष, मतभेद वाढत आहे. घरोघरी व्यसाधीनता आणि अंधश्रद्धामुळे अनेक परिवार आपले जीवन दुखाच्या सावटाखाली जगत आहे. आज संपुर्ण विश्व बुद्धाचा मंगल विचार आत्मसात करुन आपली आपल्या परीवाराची आणि देशाची प्रगती करत आहे.
भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरघरात गेले पाहिजे म्हणुन भारतिय बौद्ध महासभा शाखा हिंगणघाट मागिल अनेक वर्षा पासून धम्म प्रबोधन आयोजित करत आली आहे. यावर्षी पण वर्षावास श्रृंखलेचे निमित्य साधुन (धम्म प्रबोधन मालिका) स्थळ, समाज भवन, संत चोखोबा वार्ड येथे, भगवान बुध्दांचा कर्म सिध्दांत या विषयावर अॅड. रमेशजी थुल हे मार्गदर्शन करणार आहे.
हिंगणघाट तालुका, नगर व वार्ड शाखेच्या सर्व नागरिकांना भारतिय बौद्ध महासभा तर्फे अशी विनंती करण्यात येत आहे की, ठरलेल्या वेळेवर आवर्जुन उपस्थित राहुन धम्म प्रबोधनाचा लाभ घ्यावा.