मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत झाला बदल; जाणून घ्या कोणत्या वेळेत मिळणार लस

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत झाला बदल; जाणून घ्या कोणत्या वेळेत मिळणार लस

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत झाला बदल; जाणून घ्या कोणत्या वेळेत मिळणार लस
मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत झाला बदल; जाणून घ्या कोणत्या वेळेत मिळणार लस

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी

मुंबई,दि.29 जुलै:- मागिल अनेक दिवस पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत लाखो नागरिकांनी लस देण्यात आली आहे. लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने कमर कसली आहे. मात्र मुंबई महानगर पालिकेने लस देण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे कोविड प्रतिबंधक लस सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. तर दुसऱ्या दिवसाची लसीकरणाची माहिती दररोज सायंकाळी समाज माध्यमातून जाहीर केली जाणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 52 लाख 56 हजार 146 नागरिकांनी पहिला तर 16 लाख 53 हजार 422 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पालिका, सरकारी आणि खासगी अशा 423 लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीकरणाची वेळ नागरिकांना कळविली जाते. मात्र लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व शासकीय आणि महापालिका केंद्रांची स. 9 ते सायं. 5 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात आघाडीवर.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणात वृद्ध नागरिकाना संसर्ग झाला होता. त्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे 1 मार्चपासून मुंबईत प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत नऊ लाख 87 हजार 782 ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस तर पाच लाख 92 हजार 707 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.