वीज कोसळून मुल तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 29 जुलै: मुल तालुक्यातील दहेगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. विलास रामुजी आलाम (४२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
विलास रामुजी आलाम हे आपल्या शेतात काम करीत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस आला. यादरम्यान शेतात वीज कोसळल्याने विलास आलाम यांचा मृत्यू झाला.
त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. या दुःखद घटनेने दहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.