‘बंधुभाव’ ठेवून आगामी सण-उत्सव साजरे करूयात, पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांचे आवाहन 

47

बंधुभाव’ ठेवून आगामी सण-उत्सव साजरे करूयात, पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांचे आवाहन

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 7350050548

वाशिम: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक एकोपा निर्माण व्हावा व सर्वांनी सर्वधर्मसमभावाने गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी सतत उपक्रमशील व प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे जिल्हास्तरीय शांतता समिती संवाद व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भारत देशामध्ये सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. आपली संस्कृती जपत आपले सण / उत्सव उत्साहात साजरे करतात. परंतु काही समाजकंटक लोक त्यांच्या वैयक्तिक फायद्याकरिता सहेतुकपणे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा लोकांच्या आहारी न जाता आपण आपल्या व इतर धर्मियांच्या भावनांचा आदर करत आपले सण / उत्सव साजरे केले पाहिजे, तसेच एकमेकांना समजून घेऊन गुण्यागोविंदाने खेळीमेळीच्या वातावरणात राहिले पाहिजे. परस्पर प्रेम व बंधुभाव जोपासला पाहिजे. ‘ असे प्रतिपादन मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी शांतता समिती संवाद व आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS) यांनीसुद्धा आगामी काळातील सण / उत्सवांच्या निमित्ताने शांतता व सलोखा कायम राहील व परस्पर स्नेह अधिक वृद्धिंगत होईल यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच शासनाने आगामी काळातील मोहरम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी. दहीहंडी इत्यादी सणांबाबत शासनाने निर्गमित केलेल्या नियमांबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हास्तरीय शांतता समिती सदस्य अन्सार मौलाना, राजू कीडसे, पाटील, माधवराव अंभोरे, श्री. सुनील मालपाणी, सुशील भिमजियानी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS) हे होते तर प्रमुख मार्गदर्शक अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, (IPS) यांच्यासह जिल्हाभरातील शांतता समिती सदस्य तसेच जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी पो. नि. प्रवीण धुमाळ, रा. पो. नि. मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय, वाशिम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपोनि श्री भारत लसंते यांनी केले. आगामी मोहरम व येणारे सण, उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज असून सर्वांनी शांतता राखत सण, उत्सव साजरे करावे व कायद्याचे पालन करून शांतता राखण्यास सहकार्य करावे. असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.