हिवरखेडच्या बँक ऑफ महाराष्ट्रला शेतकऱ्यांचे निवेदन

47

हिवरखेडच्या बँक ऑफ महाराष्ट्रला शेतकऱ्यांचे निवेदन

हर्षल राजेंद्र पाटील

मोर्शी तालुका प्रतिनिधी

 मो:8600650598

मोर्शी ( हिवरखेड ): – नवीन पीककर्ज मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी जवळपास तीन महिन्यापासून मागणी केली असून हिवरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपले अर्ज सादर केले आहे , परंतु अजूनपर्यंत पीककर्ज मंजूर झाले नाही . 

 त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शेतीचे व्यवस्थापन पैसे अभावी करू शकत नाही . त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होत आहे . आशा या परिस्थिती मुळे माजी सरपंच देवेंद्र गोरडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले . 

 तात्काळ पीककर्ज मंजूर करून रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी , अन्यथा हिवरखेड येथील शेतकऱ्यांना बँकेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला , कर्जाअभावी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीच्या सुद्धा जबाबदारी ही बँकेवर राहील ,अश्या प्रकारचे निवेदन शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र हिवरखेड यांना देण्यात आले .

निवेदन देते वेळी देवेंद्र गोरडे , राहूल फरकाडे , दिवाकर पाचारे , पवन श्रीवास , जितेंद्र श्रीवास , ओंकार धोटे, विजय डेहनकर , प्रमोद गणोरकर , विजय लंगडे , गोवर्धन मेंढे , नरेश वानखडे , गोपाल जावरकर , शेखर अमृते , दीपक गहूकर , विशाल खोडस्कर , सुनील दारोकर , हर्षवर्धन अमृते , सुनील देवघरे , प्रवीण पाटील , चंद्रकांत पाटील , सुधीर वाट , दामोदर भोजने , प्रभाकर गणोरकर , पुरुषोत्तम भेले आदी शेतकरी उपस्थित होते.