वाशिम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवर प्रवेशास मनाई

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 7350050548

वाशीम जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीवरून गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने भरले आहेत. अशा परिस्थितीत पावसाळी पर्यटनासाठी हौशी पर्यटक तलावांवर जाऊन आनंद लुटत असतात, अशा अतिउत्साहात अती धाडस करुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांवर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागाच्या एकबुर्जी व सोनल मध्यम प्रकल्प तसेच ईतर सर्व लघु प्रकल्पस्थळी देखील प्रवेश मनाई करण्यात आली आहे. अतिवृष्टी व पर्यटनस्थळी जास्त प्रमाणात गर्दी झाल्यास अपघाताची शक्यता असल्याने ही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सर्व प्रकल्पस्थळी प्रवेश करण्याचा

प्रयत्न नागरीकांनी करू नये. प्रवेश केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी. सुरक्षेच्या कारणास्तव या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे. असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here