हर घर तिरंगा उपक्रमाविषयी मार्गदर्शन सभा                   

महेश बुरमवार

तालुका प्रतिनिधी मुलचेरा

 मो.न.9579059379                                           

मूलचेरा : – आज दिनांक 29/7/2022 रोजी ग्रामपंचायत चुटूगुंटा येथे हर घर तिरंगा या विषयी विशेष ग्रामसभा घेण्यात आली, त्यावेळी मार्गदर्शक म्हणून मा.किलनाके सर, कृषी विस्तार अधिकारी व मा.मेश्राम सर पेसा तालुका समन्वयक उपस्थित होते, तसेच या सभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच मा.कु.साधनाताई मडावी, उपसरपंच श्री सुरेश भाऊ आत्राम व ग्रा.पं.सदस्य, सोबत जि.प.शाळेचे शिक्षक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर,ग्रा.पं.कर्मचारी व गावातील इतर गावकरी उपस्थित होते.

हर घर तिरंगा विषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले , भारताच्या अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक घरात तिरंगा फडकवला पाहिजे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करावा गावातील शासकीय, खाजगी कार्यालयात, बचतगट समुह यांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात यावा, इत्यादी विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी चुटुगूंटा ग्राम पंचायत अंतर्गत गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here