विद्युत बिलात अतिरिक्त आकार कमी करा, नागभिड विद्युतमध्ये मनसेचे निवेदन
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड: नागभीड तालुका तथा शहरा अंतर्गत विद्युत ग्राहक खुपमोठ्या प्रमाणात आहे त्यात शेतमजूर, कामगार,व्यावसाईक तथा नौकरी वर्ग आहे. विद्युताचा वापर हा गोरगरीब जनते पासुन तर मोठ्या उद्योग दारांपर्यत सर्वत्र वापर होत असुन जिवानवश्यक गरज बनली आहे. सदर विद्युतचा वापर अनेक वर्षापासुन विद्युत वापरण्याचा लाभ घेत आहे. परंतु जस जसे वर्ष समोर जात आहे. महावितरणने वेगवेगळ्या कराची आकारणी वाढवुन तसेच विद्युत बिलाचे कर वाढत आहे.
आज महागाईने जनतेचे कमरडे मोडले त्यातच आपल्या विभागाने भर टाकली म्हणजेच आपल्या सेवे अतंर्गत येणारी लाईट बिल रक्कम हे सर्व साधारण जनतेला न झेपनारे झाले आहे. प्रती व्होल्ट प्रमाने किंवा व्हॅट मागे दर वाढ होत आहे. परंतु याकडे विद्युतविभाग दर्लक्ष करीत आहे ,तरी मनसेची मागनी आहे की आलेले चालु बिलाची रक्कम कमी करावी व सामान्य जनतेला यातुन राहत द्यावी अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्व जबाबदार प्रशासन राहणार असे सांगण्यात आले.
या वेळी सुधिर राजगडकर शहर अध्यक्ष मनसे नागभीड,बंडुभाऊ गेडाम तालुका अध्यक्ष मनसे, नागभीड,सर्जन देशमुख विद्यार्थिसेना प्रमुख, नागभीड पराग चिलबुले ,संत्तोष चोपकर व अन्य मन सैनिक उपस्थीत होते.