प्रभाग क्र. 11 मधील हरिविठ्ठल नगर परिसराची महापौर सौ.जयश्री महाजन यांच्याद्वारे पाहणी

खंडू महाले

जळगांव प्रतिनिधी

मो.7796296480

जळगाव : महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचा शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरी सोयी-सुविधांसंदर्भात ऑनस्पॉट पाहणी दौरा सुरु आहे. याअनुषंगाने गुरुवार, दि. 28 जुलै 2022 रोजी शहरातील प्रभाग क्र.11 मधील हरिविठ्ठल नगर परिसरात जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पाहणी करुन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.

पाहणी दौर्‍यादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर महापौर सौ.महाजन यांनी तात्काळ कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, नगरसेविका पार्वताबाई भिल यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here