राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखुयात घरोघरी तिरंगा फडकवूयात, नागभिड येथील शालेय विद्यार्थीनी रॅलीत दिला संदेश 

64

राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखुयात घरोघरी तिरंगा फडकवूयात, नागभिड येथील शालेय विद्यार्थीनी रॅलीत दिला संदेश 

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

नागभिड —स्वातञ्यांच्या अमृत महोत्सवी वर्षीनिमित्य 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा अभियान राबविण्यात येत आहे,या तिन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा राञीसुध्दा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे.

या पार्श् भुमीवर दिनांक 28जुलै2022 रोजी हर घर झेंडा अभियान अंतर्गत नागभिड येथील स्थानिक कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय च्या वतिने नागभिड नगरामधुन शालेय विद्यार्थीनी बॅड तासाच्या गजरात रॅली काढुन हर घर झेंडा लावा असे नारा देत अभियान राबविण्यात आले,

शाळेचे प्रार्चाय देविदास चिलबुले यांच्या प्रमुख उपस्थितित सर्व प्राध्यापक शिक्षक वृध्द विद्यार्थी वर्ग बहुसंख्येनी उपस्थित होते.