प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळाचे आ. पाटणी यांना निवेदन

50

प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळाचे आ. पाटणी यांना निवेदन

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी 

मो: 7350050548

विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी व आमदार श्रीकांत देशपांडे, अमरावती यांना प्रकल्पग्रस्त कल्याण संघर्ष समिती वाशिम जिल्ह्याच्या वतीने, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी विभागीय स्तरावर अमरावती येथे ४ मार्च ते १० एप्रिल असे ३८ दिवसाचे प्राणांतिक महापोषण प्रकल्पग्रस्तांच्या सन २००६ ते २०१३ या कालावधीत, सरळ खरेदीधारक शेतकरी यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देणे. प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेणे इत्यादी समस्या बाबत उपोषण केले होते. त्यानुसार १६ मार्च व २७ एप्रिल ला मंत्रालय मुंबई येथे प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळासमवेत संबंधित मंत्री यांच्या समवेत बैठक झाल्यात २७

एप्रिल रोजी च्या सभेचे प्रोसिडिंग सुद्धा मिळाले. त्यानुसार आज कारंजा, मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची माणिकराव गंगावणे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष प्रकल्पग्रस्त कल्याण संघर्ष समिती वाशिम. समिती पदाधिकारी शिवदास पाटील ताठे, बाबुसिंग पवार, नितीन मलमकार, दशरथ उगले, कारंजा मानोरा तालुक्यातील संपूर्ण प्रकल्पग्रस्त मंडळीच्या वतीने आमदार राजेंद्र पाटणी यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या बाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये आमदार पाटणी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत आपण पाठपुरावा करून न्याय देण्याचे यावेळी आश्वासन दिले.

याप्रसंगी हरिश्चंद्र जाधव, भास्कर इंगोले, चेतन भेंडे, मुंगसाजी कोठाळे, राहुल इंगोले, विनोद तिडके, राजू तिवारी, दीपक गोदे, मोहन मुंडे, भागवत कोहर, राजेंद्र लोखंडे, अजय रंगे इ. कारंजा मानोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.