मला उमजलेले – आबा साहेब.. आमचे प्रेरणास्थान

मा. आमदार माणिकराव जगताप यांच्या मते, आपुलकीने व शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो हे जरी खरं असले तरी माणूस उच्च शिक्षणाने व अनुभवातून परिपूर्ण ही बनतो. त्याच शिक्षणातून व्यक्यिगत विकास व समृद्धी निर्माण होते. हेच आदर्श संस्कार विद्यार्थी वर्गाच्या मनावर बिंबविण्याचे महत्त्वपूर्ण काम जी व्यक्ती करत असते तिला “शिक्षण महर्षी” असे म्हणतात. हे माजी आमदार स्वर्गीय आबासाहेब जगताप अशा व्यक्तीस बरोबर बसते.

त्यांना प्रेमाने व आदराने बहुतांश जनता आबासाहेब या कुटुंबिक नात्याने संबोधत असे. हे आबासाहेब निश्चितच सकलांचे आधार असल्याचे प्रत्येकाच्या बोलण्यातून आत्मविश्वासातून सहज दिसून येते. माझा सारख्या भेटलेल्या असंख्य व्यक्तींना प्रथम अशा असामान्य व्यक्तीला भेटण्यास संकोच वाटतो. परंतु आबासाहेबांशी संपर्क आल्यावर साहेब भेटणारी व्यक्ती कोण, कुठली, कोणत्या, पक्षाची वगैरे विचार न करता भेटण्यास आलेल्या व्यक्तीला आपुलकीची वागणूक देऊन त्याने विनंती केलेले कामे संबंधित व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे करून देत. त्यामुळे अनेकांच्या अंतकरणात आबांविषयी आदर सहाजिकच निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीने विनंती केलेले काम जर आबासाहेबांच्या कक्षेत बसत नसेल तर ते संबंधित व्यक्तीस सार्थ सल्ला देऊन त्यांचे काम पूर्ण होण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवीत. त्यामुळे सहाजिकच भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आबासाहेब विषयी एक आदर निर्माण होऊन आपण योग्य त्या तारणहार व्यक्तीस भेटल्याचे समाधान वाटत असे.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्वर्गीय आबासाहेब यांना ग्रामीण भागातील दीन-दलित, अल्पसंख्यांक, महिला आणि शिक्षणाचा गंधही नसलेल्या अज्ञानी लोकांचे जीवन जवळून पहावयास मिळाले. अत्यंत दुर्गम असे डोंगर भागात यांचे गाव घरची परिस्थिती अतिशय गरीबीची त्यामुळे शिक्षणापासून ते वंचित राहिले आणि ही खंत सतत मनात बाळगून त्यांनी अज्ञानाचा अहंकारात तळपणाऱ्या समाजाला शिक्षणाचा व अर्थाजनांचा मार्ग दाखविला. विद्यार्थी घडविण्याचे, समाज सुधारण्याचे व्रत घेतले. याच ध्यासाने त्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. याच प्रेरणीतून स्वर्गीय आबासाहेब यांनी लोकविकास सामाजिक संस्था सुरू करून त्यामार्फत उच्च शिक्षणाची सोय या महाड परिसरामध्ये सुरू केली. कोकणातल्या दीन-दलित, अल्पसंख्यांक, महिला यांना शिक्षणाची नेमकी दिशा देणारा शिक्षण महर्षी म्हणजे स्वर्गीय आबासाहेब.दिलखुलास राजकारणाने जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा, सजग राजकारणी असेच आबांचे वर्णन केले जाते. रायगड शिक्षण प्रसारक मंडळ व लोकविकास सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उच्चशिक्षण देऊन अर्थाजनासाठी तयार केले. याकरिता वेळप्रसंगी समाजातील लोकांबरोबर झगडावे लागले.

या संस्थेचा डोलारा भरभक्कम आहे. आज त्यांनी स्थापन केलेली संस्था एक वटवृक्ष म्हणून महाड शहरांमध्ये कार्यरत आहे.

महाराष्ट्राचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब जगताप यांनी 2009 मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली.महाड परिसरातील कष्टकरी,आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, वंचित महिला वर्ग आणि मुस्लिम समाज इत्यादी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याकरिता त्यांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे हीच इच्छा मनाशी बागडून या प्रेरणेतून या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाने कला,वाणिज्य व विज्ञान शाखेचे उत्कृष्ट सुशिक्षित अनेक पदवीधर तयार केले असून यापैकी सुमारे 80 टक्के मुले विद्यार्थी मुंबई.पुणे आणि परदेशात नोकरी व्यवसाय करीत आहे. 26 जुलै 2021 हा दिवस आमच्यासाठी काळ दिवस ठरला, तो म्हणजे सन्मानीय आमदार आबासाहेब जगताप त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. जरी आज आबासाहेब आमच्यात नसले तरी त्यांचे कार्य, कृती -स्फूर्ती आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. त्यांचे आचार विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरविण्याचा आम्ही सर्वजण सतत प्रयत्न करीत आहोत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. नानासाहेब जगताप यांचे मार्गदर्शन,सहकार्य आम्हाला सतत मिळत असते. त्यांच्या छत्रछायेखाली व अधिपत्याखाली राहून आम्ही या महाविद्यालयाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षणाबरोबर सांस्कृतिक, सामाजिक, स्पर्धात्मक क्रीडा, कलासाहित्य,वैज्ञानिक इत्यादी घटकांच्या विकासासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत.

आबासाहेबांचे जीवन म्हणजे कर्तुत्वाचा ज्ञानखंडाचा आणि राजकारणाचा मोठा खजिना, त्यांना परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. त्यातूनच आपल्या कोकणातल्या तरुणवर्ग शिकला पाहिजे या ध्यासाने अनेक तरुण तांत्रिक, व्यवसायिक कृषी शिक्षणाच्या पदव्या घेऊन बाहेर पडावेत म्हणून त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालये स्थापन केली. त्यामध्ये कृषी विद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ज्यु. कॉलेज आणि अनेक हायस्कूल त्यांनी या परिसरात काढली. अल्पदरात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. ही दूरदृष्टी त्यावेळी त्यांनी दाखवली नसती तर आजही महाड परिसर शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला राहिला असता. त्याचे सारे श्रेय आबासाहेबांना द्यावे लागेल. त्यांनी शिक्षण व राजकारण या दोन्ही गोष्टीतही जे काम केले आहेत हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतूनच आर्थिक फायद्याचा किंवा नफ्या तोट्याचा कसला विचार न करता त्यांनी कष्टकऱ्यांची भावना ओळखून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकास साधतांना विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या उद्योगांना बँकेचालाभ कसा होईल याचाच त्यांनी सतत विचार केला. महाड परिसरामध्ये अनेक उद्योग उभे करून कोकण क्रांतीचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. त्यातही त्यांनी महाड तालुक्याला कणखर नेतृत्व दिले. विविध क्षेत्रात काम करणारी तरुणांची फळी निर्माण केली. शिक्षण व राजकारण ही दोन्ही महत्त्वाची क्षेत्रे त्यांनी कुशलतेने हाताळली जवळजवळ

पंचवीस वर्षे त्यांनी जिल्ह्यात आणि राज्यात काँग्रेसला समर्थ नेतृत्व दिले. शिवसेनेचा झंजावत सुरू होण्यापूर्वी व त्यानंतरही आबासाहेब म्हणजे काँग्रेस पक्ष असे समीकरण राहिले इतकी त्यांची बांधिलकी पक्षाप्रती व तळागाळात होती. विधायक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सर्व जाती जमातींना एकत्र करून राजकारण केले. अल्पसंख्यांक समाजावरही अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी सामाजिक, राजकीय जीवनात कठोर प्रयत्न केले. त्यांनी अनेकांचा उद्धार केला. त्यांनी कधी द्वषाचे राजकारण केले नाहीत. चांगले काम करणारा मग तो विरोधी पक्षातील असेना त्यांच्या कामाला चांगले म्हणण्याची दानत फक्त आबांच्यात होती. अविरत कष्ट करण्याची तयारी चारित्र्य, सामाजिक, बांधिलकीची भावना या बळावरच त्यांनी आपल्या 25 वर्षाच्या कालखंडा मध्ये राजकीय-सामाजिक यंत्रणेला कार्यप्रणाव बनविले.

शासनाच्या अनेक योजना त्या काळात महाड सारख्या दुर्गम असणाऱ्या भागात गावागावात वाडी वाडीवर शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत आणि आपल्या अनुयायामार्फत पोहोचविल्या. असंख्य शासकीय कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलविली. उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याची प्रथा ही त्यांनी सुरू केली. आमदारकीच्या कालखंडात जिल्ह्याचा फलोद्यान, कृषी विकास होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोकणाचे अर्थकरण शेतीमध्येच असल्याने त्यांनी असंख्य शेतकरी कुटुंबांना मदत केली. गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत महाड परिसरात फलोद्यान व शेतीतून जी प्रगती साधली जात आहे त्यामध्ये आबासाहेबांचे धोरण दूरदृष्टी सहाय्यभूत ठरलेली दिसून येते. याकरिता त्यांनी कृषी महाविद्यालय सुरू केले व कृषी शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम सुरू करून तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेती फलोद्यान यावर आधारित उद्योग सुरू करावेत असा त्यांचा आग्रह होता. याकरिता त्यांनी बँकेचे अर्थसहाय्यही अनेकांना मिळवून दिले.

या पंचवीस वर्षाच्या कालखंडात ते अनेक संघर्षांना सामोरे गेले. त्यातून शिकून उंचगरुड भरारी घेतली. शिक्षणासाठी दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना कमी पडू नये म्हणून विविध लोकल एस.टी. गाड्या सुरू केल्या. दिवसाचे अठरा ते वीस तास खंडितपणे ते कार्यरत असत. अत्यंत खडतर अशा काळात आबासाहेबांनी समाजाच्या दायित्वापोटी निष्ठावंत सहकाऱ्यांच्या साथीने हे शिवधनुष्य उचलले. आता शिक्षणाचा हा डोलारा त्यांचे कर्तबगार बंधू मा. हनुमंतराव जगताप अध्यक्ष लोकविकास सामाजिक संस्था हे आबासाहेबांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना धरून मोठ्या जिद्दीने हिमतीने पार पाडीत आहे. त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, सार्वजनिक कामावर मनस्वी प्रेम करणारी व्यापक दृष्टी, संघटन कौशल्य, चांगले नेतृत्व, स्वालंबनाचे पुरस्कर्ते, सर्वात चैतन्य निर्माण करणारे असे विविध गुण सामावलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मा. सौ.स्नेहलता दीदी होय.

माझ्या दृष्टीने असामान्य दूरदृष्टी, विलक्षण कार्य ऊर्जा लाभलेले इतरांमधील बौद्धिकशक्ती, कार्यशक्ती ओळखून ती जागृत करण्यासाठी नेहमी ते सर्वांना संधी देत असत. अतिशय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरात जाऊन मनापासून केलेला स्वयंपाक/जेवण ते गोड

मानून घ्यायचे. नवीन योजना आव्हाने स्वतंत्रपणे झेलत असत. आणि तेथेच त्यांना कर्तुत्वालाही संधी मिळत असे. मला आबासाहेबांचा सहवास मिळाला हा एक ऋणानुबंधन म्हणावा लागेल. साहेबांची वैचारिक पातळी, बुद्धिमत्ता, दूरदृष्टीपणा समजणे इतका मी मोठा नाही. सुरुवातीला महाविद्यालयात सुरु झाल्यापासून कठीण वाटणारे प्रश्न सोडविणे हे जड जायचे पण नकार देण्याचे धाडस नव्हते. साहेबांची शिकवण समोर होती. मा.नानासाहेबांचा आधार कायम असायचा त्यामुळे काम सुरुवातीला अवघड नंतर आनंददायी वाटायचे, ज्ञानदानाबरोबरच अनेकांची आयुष्य आपल्यातून घडत आहे यातच मला आनंद आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस सर्वकाही मिळवतो तो आनंद माझ्या चेहऱ्यावर सतत जाणवतो. आबासाहेबा सारखी माणसं थोर असतात विसरावं म्हटलं तरी विसरत नसतात. कारण नात्यांचे ऋणानुबंध अतूट असतात. नेहमी दुसऱ्याचा विचार करणारे आबासाहेब हे त्यापैकी एक होय. होय मी खरंच भाग्यवान आहे की, मी त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये कार्य करीत आहे. आबांनी केलेल्या कामगिरी बद्दल बोलावं तेवढ कमीच पण थोडक्यात पण …..

“ केली विद्येची पंढरी

आबांनी महाड नगरी

स्वप्न पित्याचे पूर्ण कराया

दीदीने घडवुनी आणली सारी किमया

खेडोपाडी दीन-दलित ते

ज्ञानाशी या जडले नाते

नानाचे प्रयत्न सदैव असती जनतेच्या उव्दारी……”

 

– प्राचार्य डॉ. वाणी. एम.एन.

   एम.एम.जगताप कॉलेज महाड, रायगड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here