प्रचंड पावसातही केले महिलांनी जोरदार आंदोलन, मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आक्रोश निदर्शन…!

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई- दि.२६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी दादर रेल्वे स्टेशन च्या बाहेर, मणिपूर राज्यातील महिलांवरील अत्याचारा विरोधात मुसळधार पावसातही भारतीय लोकसत्ता संघटना, भारतीय लोकसत्ताक महिला संघ आणि कुणबी महिला मंडळ यांच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.

मणिपूर येथील घटना लज्जास्पद आहे. भारतीयांची मान खाली घालणारी आहे. पुरुषी अत्याचाराचा हा उन्माद आहे.

तेथील मुख्यमंत्री मा. एन. बिरेंद्र सिंग आणि देशाचे प्रधानमंत्री यांना या दंगल व अत्याचाराबद्दल काहीच वाटत नाही. त्यांनी भूमिका घ्यायला वेळ लावत आहेत या बाबत महीलान मध्ये चिड सदर आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.

भारत देशाच्या राष्ट्रपती महिला असूनही त्या गप्प आहेत. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. लोकशाहीतील मूल्यांची पायमल्ली होत आहे. भारतात हुकूमशाही सुरू झाली आहे की काय? त्याचा संताप व्यक्त करण्यासाठी आज सामान्य माणसाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.

महिला मग ती कोणत्याही जाती धर्माची असो परंतु शाहू,फुले, आंबेडकर यांच्या भारत देशात महिलांचा आदर सन्मान करणे ही त्यांची शिकवण आहे. सरकार फक्त *बेटी बचाव बेटी पढाव* हा नारा लावत आहे परंतु प्रत्यक्षात भारतात बेटी असुरक्षित आहे.

मणिपूर मध्ये नराधमांनी महिलेला नग्न करून तिची धिंड काढली, अलीकडचीच मुंबईतील घटना मुंबईतील मरीन लाईन येथील हॉस्टेलमधीलही मुलीवर अत्याचार करण्यात आला होता.

ही सारी कृत्य माणुसकीला काळीमा फासणारी आहेत. देशात सर्वत्र मनुस्मृती लागू झाली आहे की काय?

गेले काही दिवस मणिपूरमध्ये जातीयवादी ,मनुवादी लोकांचा हैदोस सुरू आहे. त्यावर केंद्र सरकार काहीच ठोस कारवाई करत नाही. या बाबत आंदोलन कर्त्या महिलांनी संताप व्यक्त केला.                                 

स्त्र सन्मानाची ही लढाई समस्त स्त्री वर्गाची आहे.आता गप्प बसून चालणार नाही. सरकार योग्य न्याय देत नसेल ;तर सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आलेली आहे. स्त्रीसत्ताक संस्कृती असलेल्या भारत देशात स्त्रियांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलेली आहे. तरच भारतात लोकशाही टिकून राहील. असे मत भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या उपाध्यक्षा, कुणबी महिला मंडळ च्या सचिव दिपीका आग्रे यांनी व्यक्त केले.

या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी संध्याकाळी ६:०० वाजता स्वामीनारायण मंदिर, दादर, मुंबई. येथे भारतीय लोकसत्ता संघटना संलग्न भारतीय लोकसत्ताक महिला संघाच्यावतीने महिला संघाच्या अध्यक्षा ॲड.रूपाली खळे सचिव वैशाली मोहिते व भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा.अमोलकुमार बोधिराज, उपाध्यक्ष दीपिका आग्रे, उपाध्यक्ष संतोष(सनी) कांबळे, व सचिव मंगेश खरात, विशाल गायकवाड,कमलेश मोहिते,योगेश कांबळे, मनीष कदम, संबुद्ध मोरे, सुशांत पवार,मनिष कदम,गुणवंत कांबळे, कल्पेश पवार,अमित खैरे,कविता धनावडे, प्रेमसागर बागडे, कुणबी युवा चे मुंबई अध्यक्ष महादेव कांबळे,सचिव युवराज कांबळे,युगंधरा काजारे, सानवी मोरे,करुणा पाटीलआदी महिला, पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here