अलिबाग मध्ये रंगणार शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सव

अलिबाग मध्ये रंगणार शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सव

दहीहंडी उत्सवात होणार लाखोंच्या बक्षिसांची लुट

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत दहीहंडी सोहळा मानाचा व प्रतिष्ठाचा मानला जातो. शनिवारी (दि.16) ऑगस्टला अलिबाग शहरात हा उत्सव सोहळा रंगणार आहे. दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षिसांची लुट होणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा सण साजरा केला जाणार आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित याही वर्षी दहीहंडी स्पर्धेचा सोहळा अलिबाग मधील शेतकरी भवन येथे रंगणार आहे त्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात येत आहे.

दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख 1 लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये,सहा थराच्या सलामीला अकरा हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला 51 हजार 111 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणाऱ्या
पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे अलिबागच्या माजी नगराध्यक्षा दिवंगत अॅड. नमिता नाईक यांच्या स्मृती निमित्त यंदा दही हंडी फोडणाऱ्या शहरातील महिला व पुरूष गोविंदा पथकांना विशेष बक्षीस दिले जाणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या शहरातील पुरुष गोविंदा पथकाला 1 लाख रुपये व महिला गोविंदा पथकाला 50 हजार रुपयांचे अतिरिक्त बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती प्रदिप नाईक यांनी बैठकीत दिली.