एक पेड माँ के नाम अंतर्गत श्रीक्षेत्र कनकेश्वर या ठिकाणी वृक्षारोपण
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, अलिबाग रायगड प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग स्वयंसिध्दा संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र कनकेश्वर या ठिकाणी एक पेड माँ के नाम या थीम खाली प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी प्रतिनिधी आशिष कोळी, विराज थळे, राज म्हात्रे, समीक्षा तांडेल, राज दळवी, अंजली पेडणेकर, प्रिझम संस्थेच्या प्रतिनिधी प्रणाली तळेगावकर, सानिका भगत, यांसह स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.