लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अ. भा.स्तरावर आपले नाव उज्ज्वल करेल: स्नेमिलनमेळाव्यात प्रा.संजय खडसे यांचे शुभेच्छा मनोगत
– नियुक्तीपत्रे व ओळखपत्रांचे वितरण
– वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न
– जिल्ह्यासह राज्य, केंद्रीय सदस्यांची उपस्थिती

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
अकोला- नावाची सुरूवातच लोकस्वातंत्र्यापासून करून समाज आणि पत्रकार कल्याणासाठी विधायक विचारांनी वाटचालीचा संकल्प करणारा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अखिल भारतीय स्तरावर निश्चितच आपले नांव उज्वल करेल असे प्रतिपादन अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.श्री.संजय खडसे यांनी व्यक्त केले.नव्यानेच स्थापन झालेल्या अ.भा.स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा नियुक्ती व ओळखपत्र वितरण आणि स्नेहमीलन सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सोहळ्याला जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, संस्थापक अध्यक्ष संजय एम.देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रा. संजय खडसे म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली पत्रकारांच्या योग्य भूमिकेमुळे प्रशासनालाही योग्य निर्णय घेण्यास मदत होते. समाज आणि शासन प्रशासनात समन्वयाची भूमिका बजावणाऱ्या या पत्रकार संघाकडून ती मदत निश्चितच होणार आहे . त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील भूमिका लक्षात घेऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या पत्रकारांनी सुद्धा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य भूमिका पार पाडावी. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पत्रकार सदस्य आपल्या कर्तृत्वातून आपल्या पत्रकार संघाचे नाव अखिल भारतीय स्तरावर उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून मोठे करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ.श्री.मिलिंद दुसाने यांनी यावेळी पत्रकार कसा असावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या स्थापनेबाबत उद्देशांबाबत व भेदभावविरहीत समत्वाच्या कार्य व वाटचालीबाबत सविस्तर माहिती मांडली. याप्रसंगी कर्मयोगी स्व.शिवशंकरभाऊंवर लिखाण असलेल्या सुरेश कुलकर्णी यांच्या पसायदान मासिकाचे विमोचन करण्यात आले.पुरस्कार व परिक्षण समितीच्या अध्यक्षपदी पुष्पराज गावंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम माता शारदेला हारार्पण व भगवान गौतम बुध्द, राष्ट्संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराजांना वंदन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
व्दितीय सत्रामधील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थापक-अध्यक्ष संजय देशमुख यांनी प्रथम सभेत मंजुरी झालेली नियमावली,कार्यकारिणी रचना,सभासद पात्रता स्पष्ट करून दिलेल्या जमा खर्चाची माहिती दिली.त्याचप्रमाणे कोरोना काळातील विविध मागण्या आणि पत्रकार हल्ल्याप्रकरणी शासनाकडे केलेल्या मागण्यांची माहिती दिली.
कार्यक्रमाला केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप खाडे, किशोर मानकर, पुष्पराज गावंडे, विदर्भ विभागाचे संघटन तथा संपर्क प्रमुख किशोर मुटे, हिंगणघाट, डॉ. शंकरराव सांगळे, सिद्धेश्वर देशमुख, डाॅ. संतोषजी हुशे, डॉ.अनुपकुमार राठी, बि.एस. देशमुख, नितीनजी अग्रवाल, मधुकरराव देशमुख, नंदकिशोर चौबे, संदीप देशमुख, सागर लोडम, अंबादास तल्हार, विजय देशमुख(संपादक दऊत लेखणी), अविनाश वानखडे, दिपाली बाहेकर, दिलीप नवले, रुबेन वाळके, मनोज देशमुख, निशाली पंचगाम, किर्ती मिश्रा, जया भारती इंगोले, राजेश कराळे, भूषण बागडे, लक्ष्मण धामणकर, मनोहर मोहोड, राजेश दांडगे, जयवंत पुरूषोत्तम, (पातूर)संदीप देशमुख, ,संदिप अजाबराव देशमुख,मोहन शेळके,भूषण व्याघ्राम्बरे, सुरेश कुलकर्णी,राजेश राठोड,बोचरे (बार्शिटाकळी) यांच्यासह पत्रकार महासंघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जया भारती यांनी तर आभार प्रदर्शन राजेन्द्र देशमुख यांनी केले.