वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.
वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.
वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

✒️मुकेश चौधरी✒️
उप संपादक मिडिया वार्ता न्यूज
7507130263
वर्धा/हिंगणघाट:- सध्या वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र सर्वीकडे दिसुन येत आहे. ज्या नगरीचा राजा हा नगरी चौपट करायला निघाला असेल त्या नगरीचे काय हाल होतात हे हिंगणघाट मध्ये दिसुन येत आहे. त्यामूळे हिंगणघाट शहरातील समान्य नागरिक भयाखाली आपलं जिवन जगायला मजबुर होत आहे.

औद्योगिक नगरी असलेल्या हिंगणघाट तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाचा आलेख वाढताना दिसत आहे. मात्र यावर वचक असणारे पोलीस प्रशासन पाहिजे तसे अंकुश आणण्यास असमर्थ ठरत असल्याचे गेल्या अनेक दिवसा पासून दिसून येत आहे. मागील दोन वर्षाच्या काळात हिंगणघाट पोलीस ठाण्यात संपत चौव्हान ठाणेदार म्हणुन रुजू झाले आणि हिंगणघाट शहर अंधेर नगरी बनायला सुरुवात झाली. आज शहरात गुन्हेगाराचे मोकाट साम्राज्य निर्माण झाले आहे. आणि गुन्हेगारीवर अद्याप पोलिसांचा वचक असल्याचे कुठेही दिसत नाही.

आज महाराष्ट्र शासन स्मार्ट पोलीस स्टेशन आणि क्राईम रेट कमी व्हायला भर देत आहे. तर दुसरीकडे हिंगणघाट क्राईमची राजधानी हौऊन अंधेरी नगरी होण्याकडे प्रवास सुरु केला आहे. माघिल दोन वर्षाच्या काळात मर्डर, हाप मर्डर, चोरी, गांजा, सट्टा, देशी कट्टा, अवैध दारु तस्करी, महिला अत्याचार, क्रिकेट सट्टा, अवैध भंगारची तस्करी या गुन्ह्यासह अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

वर्धा जिल्हात दारुचा महापुर..

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरी हिंगणघाट दारुचा लोट वाहत महापूर आला असल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसुन येत आहे. या अवैध दारु विक्रीला कुणाचा आशिर्वाद आहे? आणि प्रशासनाने चिरीमिरी साठी सस्पेशल लोटांगन घातले असल्याचे नागरीका मध्ये चर्च्या सुरु आहे.

हिंगणघाट रेतीची अवैध वाहतूक

हिंगणघाट औद्योगिक तालुका असल्याने ट्रॅक्टरसह मोठमोठे वाहनांनी अवैध रेती वाहतूक रेती तस्करांन मार्फत सुरु आहे. या ट्रॅक्टरवर जिल्हा प्रशासनाची नजर असली तरी याकडे हिंगणघाट तालुक्यातील महसूल व पोलीस विभागाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.

शहरातील तरुणांच्या बर्बादीला जबाबदार कोन?

हिंगणघाट शहरात सध्या तरुण बेधुंद झाला आहे. कुत्ता गोळीने तर तहलकाच माजवला आहे. त्यात भरीस भर म्हणुन गांजा, आणि दारु मुळे तर ते सैराट झाले आहे. शहरात पोलिसाची कुठलीही भीति ऊरली नसल्याने हे दिवसा ढवळ्या गुन्हे करत आहे. अशा या बेलगाम गुन्हेगारी वर पोलिसांनी अंकुश असणे गरजेचे होते पण या गुन्हेगारासाठी रान मोकळे असल्याचे तरी सध्या चित्र दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here