महाराष्ट्रातील कोरोना वायरस बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.29 ऑगस्ट:- महाराष्ट्र राज्यात कोरोना वायरस बाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे.
कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होणाऱ्यांपेक्षा आज अधिक आढळून आली. शिवाय कोरोना रूग्णांच्या संख्येतही भर सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही आहे, हे यावरून दिसून येत आहे.
महाराष्ट्रात राज्यात माघील 24 तासात 04 हजार 666 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 03 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 131 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
महाराष्ट्रात राज्यात आजपर्यंत 62 लाख 63 हजार 416 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.