महाराष्ट्र राज्यात पुन्हा रात्री कर्फ्यू लागण्याची शक्यता.

महाराष्ट्र राज्यात पुन्हा रात्री कर्फ्यू लागण्याची शक्यता.

महाराष्ट्र राज्यात पुन्हा रात्री कर्फ्यू लागण्याची शक्यता.
महाराष्ट्र राज्यात पुन्हा रात्री कर्फ्यू लागण्याची शक्यता.

✒सतिश म्हस्के✒
जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010
जालना:- कोरोना वायरसची तिस-या लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

केरळ राज्यात माघील काही दिवसात कोरोना वायरस बाधित समोर आले आहे आणि समोर येणा-या ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सध्या केरळमध्ये ओणम सणामुळे कोरोनाचे वायरसचा प्रादुर्भाव वाढले आहेत. कोरोनाने पुन्हा आपले डोकं वर काढले आहे. केरळमध्ये सध्या केरळच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजल्या नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. सध्या केरळमध्ये कोरोनाचे प्रकरण जास्त वाढले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढत आहे.

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव विचारात घेता केंद्र सरकारने या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रात्रीची संचारबंदीचा विचार करण्यास सांगितले होते. केरळमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत तिथे शाळा सुरु होऊ शकतात का याची चाचपणी करतोय.

या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राइव्ह घेण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्री राजष टोपे यांनी सांगितले.