राजुरा ब्राह्मण समाजाच्या महिलांनी केले सफाई कामगारांना राखी बांधून केले रक्षाबंधन
प्रथमच मिळाला राखीचा मान – स्वच्छता दुतांचे भावपूर्ण मनोगत

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- खलील वृत्त असे आहे की राजुरा शहरात ब्राम्हन समाजच्या वतीने : राखी असा सण जो प्रत्येक भावा बहिणीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या भावाला किंवा बहिणीला भेटीसाठी व्याकुळ करणारा, एकमेकांच्या ओढीने मायेने ओढणारा भावाच्या प्रगतीसाठी निर्व्याज भावनेने प्रार्थना करणारा तर तितक्याच हक्काने आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोडविणारा अंतर्मनाला साद घालणारा हा सण.
बरे हा सण साजरा करताना नाते रक्ताचे असणे गरजेचे असते असे नाही. जिथे हृदयातून साद येते दादा ये किंवा ताई मी आहे तुझ्या सोबतीला तुला काळजी करण्याचे कारण नाही तुझा हा बंधु तुझा सखा कृष्ण बनून तुझ्या रक्षणासाठी तत्पर आहे हे शब्दात नाही तर कृतीत सिद्ध करणारा सण म्हणजे निर्व्याज प्रेमाची केवळ अनुभुती असते. राजुरा तालुका ब्राह्मण सभेच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित केला होता आणि त्यासाठी त्यांनी साद घातली शहरातील सर्वांचे आरोग्य जपण्यासाठी, शहराला स्वच्छ ठेऊन स्वतः घाणीत काम करणार्या स्वच्छता दुतांना. बहिणीच्या मायेने आलेल्या सादेला तितक्याच तत्परतेने नगर पालिका राजुरा अंतर्गत काम करणार्या स्थायी तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन भावाचे कर्तव्य बजावत हजेरी लावली.
ब्राह्मण सभेच्या भगिनींनी अत्यंत मनातून सर्वांचे स्वागत करून आपल्या भावंडांना औक्षण करून राख्या बांधल्या व प्रथेप्रमाणे त्यांना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले त्याचप्रमाणे भाऊ बहिणीच्या नात्याचे स्वागत केले आहे