सिंदेवाही नगरपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुकेश शेंडे
तालुका प्रतिनिधि,सिंदेवाही.
मिडिया वार्ता न्यूज़,
सिंदेवाही:- नगरपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चिन्ह दिसून येते आहेत. सिंदेवाही नगरपंचायतला स्वच्छतेचा विसर पडला की नागरिकांच्या आरोग्याचे चिंता नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलास नगरपंचायत जिम्मेदार असणार का असा सुद्धा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
सिंदेवाही नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यावरती कचरा गवत वाढलेले दिसत आहेत तर नाली सुद्धा अनेक महिन्यापासून सफाई न झाल्यामुळे नालीमध्ये झाडे कचऱ्याने अतिक्रमण केले आहे. शहरात डासांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते आहे. शहरात ठिकठिकाणी कचराकुंडी लावल्या होत्या मात्र आता ते सिंदेवाही शहर सोडून गेले असल्याचे समजते.
महाराष्ट्रभर डेंग्यू, मलेरिया पाय पसरत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती स्वच्छता नसेल तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवु शकतो. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनांनी वेळीच योग्य पाऊल उचलुन स्वच्छतेवर भर देवुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी नगरपंचायत शहरातील नागरिकांनी केली आहे.