विश्व हिंदु परीषद बजरंग दल व जय बजरंग क्रीडा मंडळ हिवरखेड द्वारा आयोजित भव्य बैल जोडी स्पर्धेचे आयोजन

हर्षल राजेंद्र पाटील 

मोर्शी तालुका प्रतिनिधी

मो: 8600650598

हिवरखेड : – विश्व हिंदु परीषद बजरंग दल व जय बजरंग क्रीडा मंडळ हिवरखेड द्वारा आयोजित भव्य बैल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात सुंदर सजावट बैल जोडी तसेच सुदृढ बैल जोडीला क्रमांक देण्यात आले.

पोळ्यात २०० बैलजोडी तोरणा खाली आल्या होत्या त्यामधून ३६ जोड्यांची कमिटीने निवड केली व प्रथम क्रमांक श्री. अजय अजाबराव पवार यांना – ३१११ ₹ श्री. बाबासाहेब धरमकर यांच्या तर्फे देण्यात आले , द्वितीय क्रमांक श्री. सुरेशराव नेहारे यांना – २१११ ₹ यांना श्री. मुकेशभाऊ विठ्ठलराव शिंदे यांच्या तर्फे देण्यात आले, तृतीय क्रमांक श्री. योगेशभाऊ धोटे यांना – ११११ ₹ श्री. निलेशभाऊ वा. शिरभाते यांच्या तर्फे देण्यात आले , चौथा क्रमांक श्री. राहुलभाऊ प्रकाशराव शिरभाते – ११११ ₹ मा. शहीद खा पठाण यांच्या तर्फे देण्यात आले व प्रथम शिल्ड , द्वितीय शिल्ड, तृतीय शिल्ड हे श्री. निलेशभाऊ संपतराव शिरभाते यांच्या तर्फे देण्यात आले व प्रोत्साहनपर प्रत्येकी – ५०० ₹ व आकर्षण शिल्ड व प्रभु श्रीरामप्रतिमा व श्रीराम दुपटे देऊन एकूण ३६ बैल जोड्यांची पूजा करून बळीराजाचा सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमाला उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर हारिभाऊजी सुखसोहलळे, शर्मा गुरुजी ,बाबासाहेब धरमकर,निलेश भाऊ शिरभाते, मोहन भाऊ पाचारे, नंदकिशोरजी गांधी दत्तात्रय गेडाम इतर मान्यवर तसेच हिवरखेड गावातील शेतकरी उपस्थित होते व बजरंग दल चे कार्यकत्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here