घरघुती LPG गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त तर या राज्यात अवघ्या 450 रुपयांत गॅस सिलेंडर, सरकारचे गृहिणींना रक्षा बंधन गिफ्ट
जितेंद्र कोळी
पारोळा तालुका प्रतिनिधी
संपर्क न.-928434263
केंद्र सरकारने घरगुती गॅस धारकांना अनेक महिन्यानंतर मोठा दिलासा दिला. 200 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त झाला. तर या राज्य सरकारने त्यापेक्षा पुढचं पाऊल टाकलं. श्रावण आणि रक्षाबंधना निमित्त गॅस सिलेंडर अवघ्या 450 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला
29 ऑगस्ट: गेल्या एका वर्षांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या LPG गॅस सिलिंडर किंमतींनी घराचे बजेट कोलमडले आहेत. 400-450 रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर थेट 1100 रुपयांच्या घरात पोहचले आहे. या दरवाढीमुळे गृहिणी संतापल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती यंदा पण भडकल्या आहेत. बुधवारी, 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने अचानक घरगुती गॅसच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. वास्तविक हा निर्णय पण मलमपट्टीसारखाच आहे.गॅस सिलेंडरच्या किंमती अजून कमी असाव्यात अशी ग्राहकांची मागणी आहे. आता या राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या राज्यात घरगुती गॅस सिलेंडर अवघ्या 450 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण मास आणि रक्षा बंधनाच्या रक्षा बंधन निमित्ताने राज्य सरकारने राज्यातील महिलांना ही अनोखी भेट दिली आहे. महिन्याला केवळ 100 रुपये बिल येईल, अशी व्यवस्था राज्य सरकार करत आहे.
मध्यप्रदेश सरकारने राज्यातील महिलांन ही विशेष भेट दिली आहे. त्यानुसार, श्रावण महिन्यात महिलांना केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. रक्षा बंधन आणि श्रावण मासच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसह लाडली बहन या उपक्रमातंर्गत इतर पण अनेक लाभ महिलांना देण्यात येत आहेत.
इतकी होणार बचत
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 1108 रुपयांच्या घरात आहेत. या महिन्यात राज्यातील महिलांना केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे एका सिलेंडरमागे जवळपास 658 रुपयांची बचत होणार आहे. आता ही योजना केवळ श्रावण महिन्यापुरतीच मर्यादीत राहील की योजनेला मुदतवाढ देण्यात येईल, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. राज्य सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही.
वीज बिल अगदी कमी
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी महिलांसाठी अजून एक भेट देण्याचा निर्णय घेतला. वीजेच्या बिलात आता जास्त वाढ होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना असेल. त्यांना दर महिन्याला केवळ 100 रुपये बिल येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तर मुलींना पोलीस भरतीसाठी 30% हून 35% टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजस्थान पण नाही मागे
राजस्थान सरकार पण पात्र नागरिकांना केवळ 500 रुपयांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देत आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची ही किंमत एप्रिल 2023 पासून लागू होत आहे. आता मध्य प्रदेश सरकारने पण स्वस्तात गॅसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला हे उघड आहे.