चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्डयातून पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याची चाळण

चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्डयातून पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याची चाळण

चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्डयातून

पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याची चाळण

चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्डयातून पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याची चाळण

अलिबाग तालुका प्रतिनिधी
रत्नाकर पाटील
9420325993

अलिबाग: जिल्ह्यात सततच्या पावसा मुळे महामार्गासह ,जिल्हा,ग्रामीण भागातील रस्ते खड्यात गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत .गणरायाच्या आगमनाला अवघा आठवडा राहिला असल्याने यंदाही चाकरमान्याचा प्रवास खड्डयातून होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यापूर्वी अलिबाग-पेण, वडखळ-माणगाव,व अलिबाग रामराज मार्गे रोहा,अलिबाग-रेवस या रस्त्याची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केली होती.त्या मुळे चालकासह प्रवाशीही समाधानी होते .मात्र जुलै महिन्यात सुरु झालेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत .अलिबाग-पनवेल मार्गावरील वडखळ पासून तरणखोप या ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले. कोलाड फाटा ते माणगाव रस्ता ,अलिबाग चणेरा मार्ग रोहा,अलिबाग रामराज मार्गे रोहा,अलिबाग कार्लेखिंड मार्गे रेवस ,अलिबाग रेवस या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.खड्डयामुळे दुचाकी वाहनांसह एसटी बस अन्य वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डयामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे .
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात .महामार्गवर शासकीय बस,खासगी वाहनांची वर्दळ वाढते .राष्ट्रीय राज्य जिल्हा व ग्रामीण मार्गावरील खड्डयामुळे दर वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो ,रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असल्याने एकाच पावसात दैना होते.त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चाकरमान्याचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा ,या कडे लक्ष ध्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
दुरावस्थेमुळे चालक हैराण
महामार्गावर कायम वर्दळ असते .या महामार्गावर अनेक गावे येतात.प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहना बरोबरच एसटी बसेस ,ट्रक, अवजड वाहने, कट्रेनर याच मार्गावर धावतात मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चालकास प्रवाशांचीही वाट खडतर झाली आहे.

पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्याचा प्रवास सुखकर व्हावा ,या साठी खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत . तसेच कामाचा दर्जा आणि योग्य नियोजन करण्याबाबत संबंधिताना सूचित करण्यात आले आहे.