रा.जि .प. शाळा चांदोरे येथे अतिशय उत्साहात दहीहंडी उत्सव संपन्न.

रा.जि .प. शाळा चांदोरे येथे अतिशय उत्साहात दहीहंडी उत्सव संपन्न.

रा.जि .प. शाळा चांदोरे येथे अतिशय उत्साहात दहीहंडी उत्सव संपन्न.

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞८९८३२४८०४८📞

माणगाव : माणगाव तालुक्यातील रा.जि.प.शाळा चांदोरे येथे अतिशय उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला
अनेक सण उत्सवांनी नटलेली आपली ही भारतीय संस्कृती! त्यात श्रावण महिना म्हणजेच सणांची आरासच! विविध रंगांनी नटलेल्या निसर्गाबरोबरच ,विविध रंगी सण साजरे करून आपण आनंद लुटत असतो. असाच एक बाळगोपाळांसाठी आनंदाची पर्वणी घेवून येणारा सण म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला होय .
रा.जि. प.शाळा चांदोरे येथे सर्वांना आनंद देणारा हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजू पवार सर यांनी कृष्ण जन्माष्टमी व गोपाळ काला यामागील अख्यायिका मुलांना सांगितली.
विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा पाळणा ,गौळणी ,भजन यांचे गायन केले. फेर धरून नाच करत “गोविंदा आला रे आला”या गाण्याच्या तालावर नाच करत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.
यावेळी मुलांनी राधा कृष्ण,गोप- गोपिका ,यशोदा…अशाप्रकारच्या वेशभूषेतील मुलांमुळे कार्यक्रमाला आणखीनच शोभा आली होती.गोड बालकृष्णाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साई केंद्राचे केंद्रप्रमुख तथा शाळेचे मुख्याध्यापक राजू पवार सर, उपशिक्षिका संगीता सुरशेट्टे ,हर्षदा बोऱ्हाडे मॅडम तसेच सिकंदर लांडे सर यांनी मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांनी अतिशय जल्लोष व उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here