राजस्थान येथून आरोपीस अटक
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953
उमरेड 30 डिसेंबर 2024 रोजी. उमरेड येथील एक ज्वेलर्स दुकानात चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय आरोपीला उमरेड पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे जनार्दन पांडुरंग अड्याळ वाले यांचे मनीष अड्याळ वाले ज्वेलर्स दुकानाचे नाव असून.30 डिसेंबर 2024 रोजी सुमारे 11.30 च्या आसपास दोन इसम त्याच्या दुकानात आले. आणि सोन्याचे दागिने दाखवण्याचा बहाण्याने दोनी इसमाने फिर्यादी लक्ष विचलित करून काउंटर वरून सोन्याचे दागिने 120 किंमत तीन लाख 82हजार 352रुपे चा मुद्देमाल चोरी करून घेऊन गेले.या बाबत दुकान मालक यांनी उमरेड पोलीस येते दिलेल्या रिपोर वरून संबंधित गुन्हा ची नोंद करत गुन्हा तपासात घेतला असता या प्रकरणातील दोन आरोपी पैकी मुख्य आरोपी नाव मोहम्मद अली लिलखत अली. रा. भुसावळ जी. जळगाव हा असल्याचे निष्पन झाले होते. परंतु तो सतत आपले पत्ते बदलत होता. विविध राज्यात फिरत होता. अखेर 19ऑगस्ट 2025रोजी पोलिसाना सदर आरोपी राजस्थान येते असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपी राजस्थान येथून 21ऑगस्ट2025 रोजी राजस्थान राज्याती तहसील डेगाना जिल्हा नागोर येथील अटक केली.सदर गुन्हा त्याचा साथीदार अब्बास अली इस्लाम अली रा. मध्य प्रदेश याच्या मदतिने केल्याचे कबूल केले. गुण्यात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी 5 तोळे सोना हस्तगत करण्यात आला आहे उर्वरित मुद्देमाल हा आरोपी मोहम्मद अलील लीलाखत अली त्याने सख्या बहीणीच्या मदतीने विक्री केल्याने तिचा देखील शोध पोलीस घेत आहेत. सदर ची कामगिरी पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन उमरेड विभाग यांचा मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक धनाजी जलक, पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे. पोलीस अंमलदार. राधेशाम कांबळे, पंकज बट्टे, गोवर्धन सहारे. चेतन माहुलकर, प्रशांत काळे, सर्व पोलीस स्टेशन उमरेड यानी केली आहे.