एक अनाथ मुलगा ….
आईवडील लहानपणी वारले…
मामांकडे मोठा झाला…
मामाची घरची गरीबी…
मामा दारू पीत होता …
मामी रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतातील कामे करायची.
अनाथ मुलाला , मामाच्या बिडी पिण्याचे आणि दारू पिण्याचे आकर्षण निर्माण झाले.
तो अनाथ मुलगा एका ढाब्यावर कामाला लागला .
तेथे येणारे लोक रोज रात्री दारू पित होते . ते पाहून तो अनाथ मुलगा दारू प्यायला लागला …
त्याला दारूची सवय झाली.
काही दिवसांनी गर्द या नशिली पदार्थाशी ओळख झाली .त्याला पैसे कमी पडू लागले …
चोऱ्या करू लागला . पैशाच पाकिट चोरायच, गर्द प्यायची.
असेच एकदा पोलिसांनी पकडला …
तुरूंगाच्या वार्या चालू झाल्या…
शेवटी तडीपार झाला…
दुसऱ्या शहरात गेला.
रस्त्याने जाताना दुसरे लोक कसे सुखाने जगतात
आणि मी कसा जगतो असा विचार डोक्यात आला. काय अर्थ आहे आपल्या जीवनात ?
हे अस जगणं नको.
रस्त्याने जाताना ‘ व्यसनमुक्ती केंद्र ‘ दिसले. सरळ केंद्रात गेला.
समुपदेशनाद्वारे व्यसनमुक्त झाला.
जरा स्थिर झाल्यावर अनाथ मुलीशी लग्न केले .
सुखाचा संसार सुरू झाला….
त्याला मुलगा झाला…
मुलगा शाळेत जाऊ लागला ….
मुलगा पाचवीत गेल्यानंतर तो त्याच्या बाबांना म्हणाला , ” मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलोय”. मुलाचे वाक्य बाबाला प्रेरणा ठरले … बाबांनी रात्र शाळेत नाव घालून …दहावी पास होऊन , मुक्त विद्यापीठातून बारावी केली . पुढे मानसशास्त्रात बि.ए. केले…रस्त्यावर कपडे, भाजी विकून एक छोटे स्वतःचे घर घेतले.
तोपर्यंत मुलगा बी. काॕम. झाला. आता बाबांना वाटले मुलगा पुन्हा म्हणेल , मी तुमच्या पेक्षा जास्त शिकलो . असे म्हणू नये म्हणून …एम. ए. केले …आणि शिक्षणामुळे व्यसनमुक्ती केंद्रात नोकरी मिळाली .
आज तो सुखी संपन्न आयुष्य जगतो.
तात्पर्यः विचार बदला , आयुष्य बदलेल.